Tuesday, July 21, 2015

" शुन्यच गवसलं "

माणसाचं आयुष्य
असतं  हे असच ।
फार मोठं गोल
आहे हे रिंगण ।
जिथनं सुरु होतं
तिथच ते संपतं ।
आयुष्यभर फिरा
शुन्यच गवसतं ।
Sanjay R.

" विठोबा माउली "

विठोबा माउली
दे मज तु सावली ।
देवा यायचे मज
तुझीया द्वारी ।
मनी निर्धार
पंढरीची वारी ।
ईंद्रायणी तीरी
जण लोट भारी ।
वाहते काळजी
माय रुकमाई ।
विटेवरुन माझा
पांडुरंग पाही ।
उत्साह जनात
भरभरुन वाही ।
गजर नामाचा
आनंद देई ।
मनी आता ध्यास
विठ्ठल रुकमाई ।
Sanjay R.

Monday, July 20, 2015

" सहज "

नेत्र खुणावतात बघ मज
केलेस तु घायाळ ह्रुदयातुन ।

फिरवायचा ग मज हात
तुझ्या मोकळ्या केसांतुन ।

ओठ गोड गुलाबी तुझे मज
आहेत टिपायचे ग ओठातुन ।
Sanjay R.

अपयश तुझ्या 
मानाचा पट्टा ।
कोण करेल
तुझी थट्टा ।

मिळेल तुला
यातुनच यश ।
सोडु नको प्रयत्न
जमेल बस ।

करु या आपण
दुर्वीकारांचे दहन ।
उरतील जेही
त्यांसी करु नमन ।
Sanjay R.

Sunday, July 19, 2015

" जिवनार्थ हा असा "

जिवनाचा काय हो आहे का काही भरोसा ।

दिवस आजचा छान पण उद्या असेल कसा ।

म्हटल मनात आजवर दिला रोज झासा ।

नेकीन वागायचे आता गेलो जरी फासा ।

चार गोष्टी ज्ञानाच्या ऐकतो थोडं बसा ।

जिवनभर रडलो सोबत थोडं हसा ।

उद्या असो नसो क्षण प्रत्येक कसा ।

दुखः आणी आनंद दोन्हीत प्रसन्न दिसा ।
Sanjay R.

ले सवार ले तु
अपनी तक्दीरको  ।
लिक्खा कुछ ओर था
उस परवरदिगारने ।

वक्त इतना जब
गुजार गया ।
याद करले अब
तु अपने आपको ।

देगी सुकुन तुझे
सारी वो यादे ।
उलझा था जब तु
अपनीही याद मे ।
Sanjay R.



Saturday, July 18, 2015

" किनारा "

निसर्गाचा बघ रंगच न्यारा
क्षणात बदलतो सारा पसारा ।
दिवसा सोबतीला प्रकाश तारा
रात्री स्वप्नात शोधतो किनारा ।
Sanjay R.