देवात माझी श्रद्धा आहे
नाही ती फक्त अंधश्रद्धा ।
पुजा मी ही करतो आणी
माझ्यतला मी जागवतो ।
करुनी पुजन मी देवाचे
आत्मविश्वास मी वाढवतो ।
विचार नसतो मनात कधी
आनंदान जयपराजय
मी स्विकारतो ।
Sanjay R.
हा एकच जन्म भासतो
सात जन्मा इतका ।
परत परत हवा कशाला
फेरा नकोच मजला इतका ।
Sanjay R.
जागा असतो मी ना
लक्षच लागत नाही कुठ ।
बघत असतो दुर नी
मनात आवळतो मुठ ।
शांत मिटतो डोळे मग
शब्द पडतात कानी
बाळा उठ बाळा उठ ।
प्रेम आईच आठवत
क्षणात सुखाची लुट ।
Sanjay R.
मन असतं एक
रंग त्याचे अनेक ।
सुख दुखाःनी भरलेला
आहे कप्पा प्रत्येक ।
Sanjay R.