Saturday, March 28, 2015

" माणुस हरवला "

वऴणा वऴणाच्या वाटेवर
पसरलेत छोटेमोठे खडे ।
सांभाळुन ठेवायच पाउल
उलगडेल आयुष्याचे कोडे ।
Sanjay R.

कोण जन्माला आला
कोण कसा वरती गेला ।
नका विचारु हो मला
अजुन हिशोब नाही केला ।

कोणी कुणा फसउन गेला
कोणी जगा हसउन गेला
जिवनात कसा तो जगला
नका विचारु हो मला ।

कधी झाला जगाचा कैवारी
कधी स्वता: बलात्कारी झाला
दयावान कधी निष्ठुर झाला
नका विचारु हो मला ।

कधी दुखा:ला सामोरा गेला
कधी कुणाचे सुख घेउन गेला
सुख दुखा:चा तो वाटेकरी झाला
नका विचारु हो मला ।

दिले ज्ञानाचे पाठ कधी त्यान
कधी विनाशी आतंकी तो झाला
व्रुत्ती राक्षसी दाखवुन गेला
नका विचारु हो मला ।

चांगला भला तो का असा झाला
स्वार्थी स्वार्थाला घेउन बुडाला
माणुसच माणसत्व विसरुन गेला
नका विचारु हो मला ।
Sanjay R.

माणसांच्या गर्दित
माणुस हरवला ।
आयुष्य गेल शोधण्यात
नाहिच गवसला ।
Sanjay R.

Wednesday, March 25, 2015

" आमचा वन्डे "

कितिक झाले
जिवनात या संडे ।
गिरवले बहुत
नवनविन फंडे ।
दाखवले कुणी
आम्हा त्यांचेच डंडे ।
बांधुन बसलो चुप
धागे दोरे गंडे ।
अजुनही प्रतिक्षा आम्हा
असेल आमचाच वंनडे ।
Sanjay R.

शब्दांना हवी
जोड शब्दांची ।
सोबतिला द्यावी
साथ विचारांची ।

सुख आणी दुख:
ह्रुदयातिल जाणिवाची ।
होते कविता मग
तुझ्या माझ्या स्वप्नांची ।
Sanjay R.

करुनी वंदन त्या शुर विरांचे
स्मरण करु या आज हुतात्म्यांचे ।
दिधले मिळउन स्वातंत्र्य आम्हा
देउनी बलिदान ज्यांनी जिवनाचे ।
Sanjay R.

Sunday, March 22, 2015

" वारकरी "

येताना तुझी
बांधली होती मुठ ।
नको मागुस काही
माजेल मग लुट ।
Sanjay R.

देवा रे देवा विठ्ठला
आहे रे तुझीच ही माया ।
नामात तुझ्या दंग मी
मजवर तुझीच छाया ।
स्वता:चाच पडला विसर
ठेविला माथा तुझिया पाया ।
लोभ न उरला मज काही
दे मज बुद्धी भक्ती तुझी कराया ।
Sanjay R.

वारकरी आम्ही असु
आहोत भक्त पांडुरंगाचे ।
मार्ग भक्तीचा धरला
वाटे कल्याण व्हावे जगताचे ।
Sanjay R.

Saturday, March 21, 2015

" तराणे "

संसार हा फाटका
करु कसा नेटका ।
माझ्या मनाचे गाणे
लुप्त झाले तराणे ।
Sanjay R.

घ्यावे लिहायला
चार ओळिंचे गाणे ।

शब्दांनिच शब्दांना
सजवायचे मनाने ।

नभात घेउन एक
उंच उंच भरारी ।

लुप्त झाले
सारे तराणे ।
Sanjay R.

Monday, March 16, 2015

" आल्या गारा "

हळु हळु वाढला वारा
हलला झाडांचा पसारा ।

थेंबांची होताच बरसात
सुरु झला थडथड मारा।

पळता भुइ थोडी झाली
धरेवरी जमल्या गारा ।

अंगण रस्ते फुलुन गेले
चहुओर कश्मिर झाले ।

निसर्गाची करणीच न्यारी
उलथुन आला हिमालय सारा ।

उभ्या पिकांचा विनाश झाला
बळिच्या डोळ्यात चमकला तारा ।
Sanjay R.