Friday, March 13, 2015

" आठवणी "

प्रगटतात शब्द
रुपानं कवितेच्या ।
शोधतात किनारा
भावना मनाच्या ।
कधी अल्याड
कधी पल्याड
गाठी असतात
आठवणिच्या ।
Sanjay R.

कधी सुखाची
कधी दुखा:ची
कविता असते
मनोगताची ।
हास्याविण
होइल कशी
ती जन्मोजन्मीची ।
Sanjay R.

यादोमे तु
मेरी ख्वाबोमे तु ।
तुही तु बसी
मेरी सासोमे तु ।
Sanjay Ronghe

जिवनात बघा
आहेत नवरंग
कधी सुखात दंग
कधी दुखाच्या संग ।
Sanjay R.

कविता घेते
काळजाचा ठाव ।
कधी आनंदाचे नाव
कधी दुखाःचे घाव ।
Sanjay R.

बघ थोड आकाशी
फुलला तिथे कल्पतरु ।
देउन पंखांना गती
क्षितिजाची वाट धरु ।
Sanjay R.

" सारी ही माया "

तुझे गित
माझी झंकार ।

माझे मित
तुझा होकार ।

नाही आकार
नाही विकार ।

हरवले क्षण
सारे निराकार ।
Sanjay R.

प्रभु तुझीच रे किमया
आहे सारी ही माया ।
विचारातच सारा
वेळ जातो वाया ।
Sanjay R.

शब्दांमधे असते ताकद
नजरेला का पडतो भ्रम ।
विचारांना अनेक वाटा
स्पर्श असावा सर्व प्रथम ।
Sanjay R.

Friday, March 6, 2015

" नारी शक्ती "

नारी शक्तीची किमया महान ।
करावा तितका कमीच सन्मान ।

ममता करुणा वात्सल्याची मुर्ती ती
कधी होइ ती शुर विर पराक्रमी महान ।

कितीक नावे घ्यावी इतिहासातील
थोरवी गाता उरी दाटे अभीमान ।

विसरताहोत आम्ही द्याया तिज सम्मान
आहे तीच अमुच्या प्रत्येक घराची शान ।
Sanjay R.

Saturday, February 28, 2015

" थंड वारा "

थकला भागला थांबला वारा
पावसानही बदलला त्याचा किनारा ।
अडला प्रकाश दाटला काळोख
लपला सुर्य उतरला पारा ।
Sanjay R.

गार गार थंड थंड वारा
पावसाचा हलका फवारा ।
मधेच गेला पावर
पडताहेत आता गारा ।
Sanjay R.

" अकाळी पाउस "

आज आला होता
आमच्या गावी
पाउस मोठा ।

पावसाळा गेला
आला नाही तेव्हा
कीती तो खोटा ।

सिझन गेला अक्खा
पिकल नाही काही
सांगा तुम्हीच
येतील कुठुन नोटा ।

नेहमीचच झालं
यंदाही भोगु
नशीबाचा खेटा
Sanjay R.

लाभेल मज आता
सहवास कविंचा ।
स्फुरतील शब्द
आनंद मनीचा ।
Sanjay R.

गार गार थंड थंड वारा
पावसाचा हलका फवारा ।
मधेच गेला पावर
पडताहेत आता गारा ।
Sanjay R.
������������