Friday, March 6, 2015

" नारी शक्ती "

नारी शक्तीची किमया महान ।
करावा तितका कमीच सन्मान ।

ममता करुणा वात्सल्याची मुर्ती ती
कधी होइ ती शुर विर पराक्रमी महान ।

कितीक नावे घ्यावी इतिहासातील
थोरवी गाता उरी दाटे अभीमान ।

विसरताहोत आम्ही द्याया तिज सम्मान
आहे तीच अमुच्या प्रत्येक घराची शान ।
Sanjay R.

Saturday, February 28, 2015

" थंड वारा "

थकला भागला थांबला वारा
पावसानही बदलला त्याचा किनारा ।
अडला प्रकाश दाटला काळोख
लपला सुर्य उतरला पारा ।
Sanjay R.

गार गार थंड थंड वारा
पावसाचा हलका फवारा ।
मधेच गेला पावर
पडताहेत आता गारा ।
Sanjay R.

" अकाळी पाउस "

आज आला होता
आमच्या गावी
पाउस मोठा ।

पावसाळा गेला
आला नाही तेव्हा
कीती तो खोटा ।

सिझन गेला अक्खा
पिकल नाही काही
सांगा तुम्हीच
येतील कुठुन नोटा ।

नेहमीचच झालं
यंदाही भोगु
नशीबाचा खेटा
Sanjay R.

लाभेल मज आता
सहवास कविंचा ।
स्फुरतील शब्द
आनंद मनीचा ।
Sanjay R.

गार गार थंड थंड वारा
पावसाचा हलका फवारा ।
मधेच गेला पावर
पडताहेत आता गारा ।
Sanjay R.
������������

Friday, February 27, 2015

" जिवनरथ "

सांग रे देवा तुच आता
चंद्र चांदणीची प्रेम गाथा ।

लैला मजनु हिर रांझा
सार्यांची का तीच व्यथा ।

माझही आहे प्रेम तिच्यावर
होइल का मग आमची कथा ।

प्रेमाविण रे जिवन अधुरे
चाकं असे या जिवनरथा ।
Sanjay R.

" हा स्वप्न भास "

असता मनी काही ध्यास ।
छळतो मज हा स्वप्न भास ।
कधी आनंदानं फुलतो श्वास ।
कधी होतो दुखा:चा आभास ।
Sanjay R.

ना मज कोणी तुडवले
ना भुललो मी वाटा ।
क्षणीक असे जिवन माझे
सोबतीचा इतकाच वाटा ।
Sanjay R.

कितीही मोठ होउ दे
विसरायच वय ।
लहान होउन
साधायची लय ।
आनंदी जगात
मिळवायचा विजय ।
Sanjay R.