Sunday, October 26, 2014

" चिंतेची वारी "

येणार ति म्हणुन
तयारी केली सारी ।
ति आली आणी गेली
विचार आता भारी ।
पगार तर केव्हाच सरला
दिवस रात्र चिंतेची वारी ।
Sanjay R.

अवतरता सुर्यकिरण
निघे अंधार स्रुष्टीचा ।
स्वयंदीप प्रज्वलित होता
निघे काळोख मनाचा ।
Sanjay R.

Friday, October 24, 2014

" दिवाळी झाली "

आली दिवाळी
झाली दिवाळी ।
आवाजात फटाक्याच्या
बसली कानठळी ।
जेवणात मिळाली
गरम पुरण पोळी ।
घरोघरी रोषणाइ
उजळल्या दिपमाळी ।
लाभली आकाशाला
नवरंगी झळाळी ।
Sanjay R.

घेउन तुज मिठीत माझ्या
अनुभवायचा मज स्वर्गसुख ।
तु मी फक्त दोघच असु आपण
झेलायची आता थोडी रुखरुख ।

Tuesday, October 21, 2014

" आकाश "

बघुन तुझ्या नेत्रात आज
ओढ मजला अशी लागली ।
तु माझी अन मि तुझा
तुच माझी कविता झाली ।
Sanjay R.

क्षण तो अवचित आला
मन मोकळे करुन गेला ।
प्रितीची तुझ्या माझ्या
पावती तो देउन गेला ।
तन मन असे ओथंबले
चिंब चिंब भिजउन गेला ।
ओठ आता आतुर झाले
ये ना तु मधु प्राशनाला ।
Sanjay R.

चाहता हो दिल अगर
रोको ना अब लब्जोको ।
है इंतजार कानोको भी
खुलने दो अब होठोको ।
Sanjay R.

घेउन गाठोड विचारांच
घातल पालथ जग ।
हळु हळु संपतेय
श्वासातली धग धग ।

म्हणायच तुला जे
सांगुन येकदा बघ ।
निरभ्र होइल आकाश
निघुन जाइल ढग ।
Sanjay R.

Saturday, October 18, 2014

" आली आली दिवाळी "

आली आली दिवाळी आली
स्वच्छतेला गती मिळाली ।
झाडुन पुसुन स्वच्छता झाली ।
रंग रंगोटीन भींत चमकली ।
बाजाराला झुम्मड निघाली
कपड्या लत्त्यांची खरेदी झाली ।
फटाके मिठाई सज्ज झाले
घरात सगळ्यांचीच चंगळ झाली ।
विचार आता मलाच पडला
लाखाच्या घरात उधारी झाली ।
Sanjay R.

Friday, October 17, 2014

चारोळ्या

केव्हा येणार तु

कुशीत माझ्या ।

हात केसांतुन 

फिरवायचा तुझ्या ।

आसुसले ओठ

का देतेस सजा ।

तुझ्याच आठवणीत

जगतो मी माझा ।

Sanjay R.


नको ना ग रुसु

नको ना रागाउ ।

आहे माझ्याकडे

तुजसाठी खाउ ।

गीत प्रेमाचे

मिळुन ये गाउ ।

स्वप्नपरी तु माझी

मिठीतच राहु ।

Sanjay R.

बघुन चित्र तुझे
लिहील्या त्या ओळी ।
कशी ग तु अशी
आहेस किती भोळी ।
Sanjay R.

लिहील्या चार ओळी
चित्रावर तुझ्या ।
नाही उरले शब्द आता
कवितेस माझ्या ।
Sanjay R.

हिच तर अदा तुझी
किती मला आवडते ।
नाही मन भरत
परत परत वेडावते ।
Sanjay R.