आली आली दिवाळी आली
स्वच्छतेला गती मिळाली ।
झाडुन पुसुन स्वच्छता झाली ।
रंग रंगोटीन भींत चमकली ।
बाजाराला झुम्मड निघाली
कपड्या लत्त्यांची खरेदी झाली ।
फटाके मिठाई सज्ज झाले
घरात सगळ्यांचीच चंगळ झाली ।
विचार आता मलाच पडला
लाखाच्या घरात उधारी झाली ।
Sanjay R.
Saturday, October 18, 2014
" आली आली दिवाळी "
Friday, October 17, 2014
चारोळ्या
केव्हा येणार तु
कुशीत माझ्या ।
हात केसांतुन
फिरवायचा तुझ्या ।
आसुसले ओठ
का देतेस सजा ।
तुझ्याच आठवणीत
जगतो मी माझा ।
Sanjay R.
नको ना ग रुसु
नको ना रागाउ ।
आहे माझ्याकडे
तुजसाठी खाउ ।
गीत प्रेमाचे
मिळुन ये गाउ ।
स्वप्नपरी तु माझी
मिठीतच राहु ।
Sanjay R.
बघुन चित्र तुझे
लिहील्या त्या ओळी ।
कशी ग तु अशी
आहेस किती भोळी ।
Sanjay R.
लिहील्या चार ओळी
चित्रावर तुझ्या ।
नाही उरले शब्द आता
कवितेस माझ्या ।
Sanjay R.
हिच तर अदा तुझी
किती मला आवडते ।
नाही मन भरत
परत परत वेडावते ।
Sanjay R.
Wednesday, October 15, 2014
" मैत्री "
गोड गुलाबी सदैव हसरा
प्रसन्न असा तुझा चेहरा ।
वेध घेइ नेत्र तुझे टिपती
सुख: दुखा:चा जिवन पसारा ।
प्रतिभेचा सुरेख संगम
विद्वत्तेचा त्यास किनारा ।
वांग:मयात पारंगत तु
लेखणी असे तुझा सहारा ।
गगनात सार् या चमचमणारा
आहेस तु एक सितारा ।
लाभली मैत्री भाग्य माझे
निभवील झेलुन वादळ वारा ।
Sanjay R.
" चक्र "
धरायचा मला चंद्र
आणी गाठायचा स्वर्ग ।
सोबतीला नाही कोणी
सखे तु येशील का ग ।
Sanjay R.
सामावल यात निसर्गाच चक्र
रूजेल आणी फुलेल एक अंकुर। ।
माणसान केला कितीही कांगावा
तरी थांबणार नाही जाइल दुर दुर ।
Sanjay R.
असावा पुर्व जन्माचा
काही असा एक संबंध ।
मैत्री तुझी माझी अशी
जसा क्रुष्ण राधेचा बंध ।
Sanjay R.
Sunday, October 12, 2014
" वादळ "
वादळात सापडलेल मन
बाहेर निघायची तगमग
प्रतिक्षेत असलेले नेत्र
आणी
त्यात आनंदाची एक लहर
झोकुन द्यायच असत त्यात
विसरायची असतात दुखः
हवा असतो आनंद परमानंद
शोधात मी भटकतो दारोदर
लाभते मज हे कवितेत सारं ।
Sanjay R.
अब तक ना
समझ पाये उनको ।
हुवे हम उनके
पर ना हुवे वो हमारे ।
जब समझे थोडा
तो रिश्ताही न रहा ।
Sanjay R.
का रे तु हिरावलास
आनंद माझा ।
दिले सर्वस्व तुजला
आणी विसरलास मला ।
Sanjay R.
आनंदच माझा
दुर दुर जातोय ।
धरा कुणीतरी
गटांगळ्या मी खातोय ।
Sanjay R.
एक आठवण
नजरेपुढे क्षणन क्षण ।
दिवसा मागुन
दिवस जातात ।
घर आठवणींच
मोठ होत ।
हरवतो आपण
त्यातच मग ।
जगतो आठवत
मग कण न कण ।
Sanjay R.
मनात अगणीत
विचारांच काहुर ।
क्षणात लागे मनी
एकच हुरहुर ।
क्षण निसटतो
जातो दुर दुर ।
Sanjay R.