Thursday, August 28, 2014

" बंध वेदनेशी "

सोबत तुझी लाभली मजशी ।
लोपले दुखी बंध बघ वेदनेशी ।
द्विगुणीत आनंद नाते तुजशी ।
न उरे लालसा तुच मजपाशी ।
Sanjay R.

कुणाला म्हणायच आपलं
आणी कोण आहे परकं
फरक करण फारच कठीण
आपलेच देतात दगा तेव्हा
सरकते वाळु पाया खालुन
परकेच वाटतात आपल म्हणुन ।
Sanjay R.

Tuesday, August 26, 2014

" आनंद "

पावसाचा बंध ।
मोगर् याचा गंध ।
मन बेधुंद ।
आनंदी आनंद ।
Sanjay R.

Sunday, August 24, 2014

" जाउ द्या मज काशीला "

जायचे मज काशीला
नको कुणाचा वशीला
विरोध माझा घुशीला
खाउ घालील म्हशीला
पाठवा त्यांना फाशीला
मिळेल माझ्या राशीला
पुरेल माझ्या शशीला
जाउ द्या मज काशीला
Sanjay R.

ना रोनाधोना
ना कोइ बहाना ।
साथ आपका हो तो
बस हसना और हसाना ।
Sanjay R.

सोड तुझा रुसवा
गाल तुझा हसवा
हट्ट थोडा फसवा
बघुन रुप तुझे
सरतो थकवा ।
Sanjay R.

कळेना मज तु हट्टी कीती ।
जडली माझी तुजवर प्रिती ।
शब्द संग्रह तुझी श्रिमंती ।
गुंतली तुझ्यात माझी मती ।
Sanjay R.

रमत गमत धरेवरी
उतरती पाउस धारा ।
सोबतीला त्यांच्या
गार गार वारा  ।
हळुच डोकावे जेव्हा
उन किरणांचा तारा ।
कोमेजुन जाइ धरा
तापी तो दिनकरा ।
Sanjay R.





" थिजले शब्द ओठी "

थांग मनाचा तुझ्या
मज लागेल कसा ।

भाव नेत्रातला
तुज उमजेल कसा ।

थिजले शब्द ओठी
सांग सांगु कसा ।

उफाळला डोह आता
मी थांबु कसा ।
Sanjay R.

श्वासात माझ्या
आभास तुझा ।
फुलला मोगरा
खास तुझा ।
दरवळला गंध
श्वास तुझा ।
प्रवासात मी
सोबती तुझा ।
Sanjay R.

प्रित अशी नको
ठेउस तु बंधनात। ।
होउ दे विचार
मोकळे थोडे ह्रुदयात ।
घेउ दे उंच
एक भरारी  गगणात ।
मिळेल मणभर
विसावा अंगणात ।
Sanjay R.

Thursday, August 21, 2014

" दिल की बात दिल ही जाने "

बाते हो बडी या छोटी |
कहने से दिल रूकता नही |
करो दिल से अगर कोई बात |
दिल है हमारा |
कभी झुकता नाही |
Sanjay R.

गोबरे गाल तुझे, ओठ गुलाबी |
नेत्र लापाविलेत आहेत ते शराबी |
हास्य तुझे प्रसन्नतेची चाबी |
हृदयी जपेन मी तुझीच ग छबी |
Sanjay R.

थांबतो तो
रस्ता नसतो |
पुढे जायला
पडदा नसतो |
Sanjay R.

दिल कि बात दिल हि जाने |
कोई माने या ना माने |
मेहेसुस तो करते
बस आपकोही हम |
जाब धुंडणे निकालते
तो नजरही नाही आते |
Sanjay R.

दिलेला शब्द
यायचा नाही परत |
पाळता पाळता
जीवन जात सरत |
Sanjay R.

कविता म्हटला न कि
डोंगर भर विषय दिसतात
लिहिताना मात्र पेन हळूच थबकतो.
आणि सांगतो बघ
अरे बाबा सांभाळून चलव
शब्दच तुला ओढून धरतील
Sanjay R.

तुझे माझे सुर
एकत्र असे यावे ।
गाण प्रितीचे
बेधुंद होउन गावे ।
मनोमिलनाच्या रात्री
तारे उधळावे ।
Sanjay R.

देशील का ग मला तू
सदैव तुझीच आठवण |
चांदण्या रात्री चंद्राच
चंद्रिके सह जागरण |
Sanjay R.

नको रोकुस शब्दांना
नको टोकुस शब्दांना |
तार एकदा छेडून बघ
लय मिळेल शब्दांना |
Sanjay R.