ना सोचो इतना सबकुछ
याद हमे भी है कुछ कुछ ।
ख्वाबो मे भी आपही होती
अब भी जीते वही सबकुछ ।
Sanjay R.
Wednesday, August 13, 2014
" शोध आसमंतात स्वरुप तुझे "
तस्वीर तुझी
बघत रहायची
सवय मला जडली ।
तुजवीण जिवन
विचारही नकोसा
लाइफ स्टाइच बिघडली ।
आठवत मला आजही
दुर जायच म्हणताच
कीती तु रडली ।
घेउन हातात हात
प्रत्येक पायरी
सोबतीन तु चढली ।
Sanjay R.
मैत्रीच नात
अती श्रेष्ठ ।
मिळतील परत
झाले जरी रुष्ठ ।
दुखाःत एक
दुसर्याला कष्ट ।
नात मैत्रीच
सगळ त्यात स्पष्ट ।
Sanjay R.
आसवांनी डबढबले
डोळे तुझे ।
घायाळ मन
अस्थीर तुझे ।
दे झिडकरुन
सारे बंध तुझे ।
शोध आसमंतात
स्वरुप तुझे ।
Sanjay R.
Sunday, August 10, 2014
" जिव वेडा "
सहज तुटणार्या धाग्याच
कीती मजबुत हे बंधन ।
भावा बहिणीच्या नात्याच
सुगंधीत हे चंदन ।
Sanjay R.
मन वेड का जिव वेडा
गहन प्रश्नाच आहे कोडं ।
दिवसाही पडतात स्वप्न
कशाचिच कशाला नसते जोडं ।
जगतो मात्र क्षण न क्षण
न उलगडणारी कागदांची मोड ।
Sanjay R.
Wednesday, August 6, 2014
" सुरु झाला प्रवास "
आठवणी तुझ्या माझ्या
होउन चिंब ओल्या
झरतील त्या पाणी ।
थबकतील श्वास तीथे
गातील मधुर सुरासंगे
मनोमिलनाची गाणी ।
Sanjay R.
निळ्या काळ्या नभांनी
वेढुन घेतल आकाश ।
थेंब थेंब पावसाचा
सुरु झाला प्रवास ।
लागली असेल धाप त्याला
मधेच सोडला श्वास ।
Sanjay R.
Tuesday, August 5, 2014
" तुझाच तो बंध "
तुझाच तो बंध
बांधुन घेतला हाताला ।
मैत्रीच नाव दिल
तुझ्या माझ्या नात्याला ।
जखम मज होता
वेदना तुझ्या मनाला ।
मिच का असा लोटतो
दुखाःत तुझ्या आनंदाला ।
Sanjay R.
मैत्री जिवनभराची साथ असते ।
मदतीला तिचाच हात असते ।
दुर नजर टाकुन थोड बघा
मैत्रीच जिवनभराचा आधार असते ।
Sanjay R.
कामात असे राम
राधे शाम राधे शाम
जिवनात एकच नाम
आहे त्याचेच दाम
बस करा फक्त काम
सोबतीला आहे राम ।
राम राम राम राम ।
Sanjay R.