Sunday, December 22, 2013

” जपायचे बेधुंद मनाला “

गोड मधुर हलकी थंडी
उब हवी आता तनाला ।
हळुच पांघरुणात शिरायचे
जपायचे बेधुंद मनाला ।
sanjay R.

येता झुळ झुळ वारा
डोलतो निसर्ग सारा
मनही लागे डोलाया
शोधीतो एक किनारा
sanjay R.

” अधीर कान झाले ऐकाया काव काव ”

कावळोबा करता
तुम्ही काव काव ।
दिसत नाहीत इतक्यात
सोडला का गाव ।
लहानपणा पासुन
ऐकतोय तुमचे नाव ।
काडीच्या घराची
आहे तुम्हास हाव ।
वाहुन गेले तरी
परत मांडता डाव ।
या परत येकदा
छान आमचा गाव ।
अधीर कान झाले
ऐकाया तुमची काव काव ।
sanjay R.


उघडता बंध
येक मनात ।
दरवळतो गंध
प्रेमाचा क्षणात ।।
अवतरते गोड
छवी एक नजरेत ।
धुंद होतो मी
तुझ्या कल्पनेत ।।
घेउनी तुझाच
हातात हात ।
दुखः सारी
विसरतो क्षणात ।।
झेपावतो आकाशी
असते तुझीच साथ ।
नाही मग उमजत
सरते कशी ती रात ।।
sanjay R.

” मनाचा खेळ न्यारा “

मनाचा खेळ न्यारा
लगे सबकुछ प्यारा ।
सभोवताल बघा जरा
सुंदर कीती ही धरा ।
sanjax R.

सुर्य आहे सोबतीला
आणी चंद्र साक्षीला ।
परीजात हा बहरला
सुगंध येयी जिवनाला ।
sanjay R.

हॅ बहोत यहा लेकीन
दोस्त आपसा नही कोई ।
और हमे चाहीये क्या
दोस्ती आपकी हमने पाई ।
sanjay R
.
काय झाले कुणास ठाउक
कवीता माझी रुसली ।
सोडुन एकट्यास मला
एकांतात जाउन बसली ।
मनच लागत नाही आता
मनी चिंता आहे कसली ।
चाहुल तुझी लागताच मना
बघ कविता पण माझी हसली।
sanjay R.

तुझ्या आठवणींचा
बघ कसा डोंगर झाला
कळले नाही म्हणतेस तु
चंद्रही बघ नजरेआड झाला
sanjay R.

घेउन तुला छातीशी
निवांत झोपील म्हटल
आधीच झोपी गेलीस तु
स्वप्न न बघताच तुटल
sanjay R
.
बाळा जो जो रे बाळा
तान्हुला तु छकुला तु
टीका केला काळा ।
इवली इवली पावल तुझी
चढवील्या वाळा ।
चिउ काउ या रे सारे
भरवायची आहे शाळा ।
sanjay R
.
किलबील पाखरांची सुंदर
गंध पुष्पांचा सुंदर
बहरली वनराई सुंदर
बघा चौफेर ही धरा सुंदर
मी सुंदर मन माझे सुंदर
sanjay R.

सनडे कमाल
हाती रुमाल
गाण्याचा ताल
लुंगी डांस करुन
उडवु या धमाल
sanjay R.

” देवा मला तु पाव "

कसा मनावर
केलास तु घाव ।
नाही कशाची आता
मजला उरली हाव ।
अखंड जपतो देवा
तुझेच मनात नाव ।
आता तरी येकदा
देवा मला तु पाव ।
sanjay R.

मी नाही काळा
ना मन माझे काळे ।
ओढ तुझी मजला
नजरही मागेच वळे ।
आसक्ती तुझी मजला
तुजसाठी मन झाले खुळे ।
मनीशा तुझी मजला
मग मन असे का जळे ।
sanjay R.

मी पण बेचैन
इथे तुझ्याभेटीसाठी ।
मनाला कसे समजाउ
होणार कधी भेटीगाठी ।
sanjay R.

प्रेमात असते सगळच माफ ।
उकळल्यावर निघते वाफ ।
झाला जर पत्ता साफ ।
पिटायचे टाळ गेल्यावर साप ।
sanjay R.

उठा उठा सगळे जण
स्मरण करा श्री गजानन
भजन करा जय श्रीराम
चहा झालाय गरमागरम
ब्रेड बिस्कीट आहे संगतीन
भराभर आटोपा आपली काम
दिवस चांगला मिळेल आराम
श्रीराम श्रीराम जय श्रीराम
sanjay R.

” सागर पुढे असतांनाही आसवातच न्हालो “

का तु मज अशी
इतकी छळतेस ।
दिवस रात्र मन
माझे जाळतेस ।
दुर असतेस तेव्हा
खळखळुन हसतेस ।
येताच जवळ अशी
दुर का सारतेस ।
sanjay R.

आठवणीत तुझ्या मी
व्याकुळ इतका झालो ।
सागर पुढे असतांनाही
आसवातच न्हालो ।
तस्वीरीतली छवी तुझी
ह्रदयी असा मी ल्यालो ।
एक एक आठवण तुझी
आत ओठांच्या मी प्यालो ।
sanjay R.

नात तु अन मीच
पाळायच बघ तुलाही ।
मैत्रीची हा बंध
ठेवायचा गाठीशी मलाही ।
तु मी म्हणतांना
अनुभवतो मी एक जिव्हाळा ।
एक एक करुन सरेल दिवस
आयुश्याचा प्रत्येक पावसाळा ।
sanjay R.