Tuesday, August 21, 2018

" बघ थोडं वळून "

बघ थोडं वळून
येईल तुला कळून

वर बघ आकाशात
काळं कुट्ट आभाळ
त्यातून डोकावतो
मंद मंद प्रकाश

मधेच कशा मिरवतात
पावसाच्या सरी
ढगा आडून अवतरते
जशी इंद्राची परी

गडगडते कधी आभाळ
लखलखते कधी वीज
चल जाऊ पावसात
सोबत माझ्या भिज

झालेत किती पावसाळे
आठवतात का तुला
मोजायचा होता पाऊस
सोबत तुझ्या मला

जाऊ नकोस पुढे
थांब ना थोडी गडे
धावू दे ढगांना
झालेत ते वेडे

बघ थोडं वळून
येईल तुला कळून
Sanjay R.


No comments: