Thursday, January 5, 2017

" परतीच्या वाटेवर "

" परतीच्या वाटेवर "

आहे हा वळणा वळणांचा थाट
कशी ही खाचखळग्यांची वाट ।
टाकले पहीले पाउल तेव्हा मी
नव्हता आधार कशात ।
पडलो झडलो आणी उठलो
हाती आई बाबांचा होता हात ।
उभा ठाकलो मी पायांवर तेव्हा
रोजच होती एक नवी पहाट ।
घातली पालथी दुनीया सारी
शोधला आनंद मी तयात ।
दुर पाहीले मृगजळ सुखाचे
झाले जेव्हा दोनाचे सहा हात ।
नव्हती उसंत मज एक क्षणाची
जशी सागरात उठणारी लाट ।
नाही उरला त्राण क्षीण झाले श्वास
शोधतो मी आता माझी परतीची वाट ।
Sanjay R.

No comments: