Tuesday, February 9, 2016

" असच काहीसं "

असच काहीसं
मलाही होतं करायचं ।
हातात घेउन चांदणी
नभात होतं फिरायचं ।
मधेच घालुन प्रदक्षीणा
चंद्राला होतं धरायचं
दुर असणार्या सुर्याला
आणुन जवळ सोडायचं ।
गरमी होताच फार मग
बरफात त्याला ठेवायचं
रात्री त्याला सोडुन देउन
सक्काळी त्याला धरायचं ।
अंगणात रोपटं छान
चमचम चांदणीचं लावायचं ।
फुल चांदणीचं उगवताच
सुगंधात बेधुंद होउन नाचायचं ।
Sanjay R.

नदी काठचा
गाव माझा ।
वाहते पाणी
झुळझुळ वाजा ।
रोज सकाळी
पोहायची मजा ।
सायंकाळी होतो
दीपोत्सव दुजा ।
Sanjay R.

अनोखा असा हा
प्रेमाचा मणी
मनात ठसली की
नाही उरत
दुसरी कोणी ।
तिच असते
मनातली राणी ।
मनच मनाची
व्यथा जाणी ।
Sanjay R.

No comments: