Friday, February 19, 2016

" परत तीच सकाळ "

असतात जिवनाला कथा
भरभरुन असतात व्यथा
पार करायच्या सार्याच
होउन सामोरे स्वत:
बांधुन टाकायची सारी
दुखा:ची संपुर्ण गाथा ।
जगायचे जिवन आनंदाने
करुन हसरा ताठ माथा ।
Sanjay R.

घण घण वाजे घंटा
झाली आता सायंकाळ ।
दुर तो दिसतोय ना धुर
पेटतो तिथं जिवनाचा जाळ ।
कष्ट करुन थकले हात
घरी रडतय तान्हुलं बाळ ।
दोन घासांच्या पोटा साठी
बेंबीची ती तुटते नाळ ।
रोज हाती मरण घेउन ।
उगवते परत तीच सकाळ
Sanjay R

No comments: