Thursday, February 4, 2016

" होइल सकाळ "

हळुच साधतो
डाव आपुला ।
मारुनी डंख
करतो घायाळ ।
दुखावते मन
डोळ्यात पाणी
जिव्हारी बाण
मन रक्तबंबाळ ।
संथ श्वास
ह्रुदयात जाळ ।
विसरा सारे
येउ द्या काळ ।
सरता भ्रमण
त्या चंद्राचे ।
उगवेल सुर्य
होइल सकाळ ।
Sanjay R.

फार लाउन
घेतेस तु मनाला ।
काय फरक
पडतो कुणाला ।
मन गुंततं
जातं मग विचारात ।
फरक पडतो मग
थोडा आचारात ।
एक हास्य तुझे
विसरतो सारं क्षणात ।
Sanjay R.



No comments: