Sunday, February 15, 2015

" निरंतर ही लता "

काउन रे देवा
अस काउन केल ।

आम्हालाच का
म्हातारपन दील ।

लहानपनच बर होत
मोठ्ठे आता झालो ।

नाही परत मिळणार
सगळच गेल ।

हालच आहेत जिवाचे
कर काही भलं ।
Sanjay R.

काय कशी वर्णावी
प्रेमाची ही गाथा ।

इतीहासातही प्रचलीत
नाना विधी कथा ।

झेलल्या कितीकांनी
अगणीत व्यथा ।

परी प्रेमाची बहरते
निरंतर ही लता ।

वेड म्हणावे यासी
कि भावनेची चिता ।

हळुवार मनाची
सुरेख संदर गिता ।

भावबंध जुळवीतो
तोची कर्ता करवीता ।
Sanjay R.

जळतील आठवणी
ह्रुदया संगे ।
मनात होतील
वाचारांचे दंगे  ।
ताल सुरा विन
का मैफिल रंगे ।
Sanjay R.

लेखणीची धार
अनुभव अपार ।
चांगल्या वाइटाचा
नकोच विचार ।
विनाकारण होतो
डोकयाला भार ।
लिहायच मनातल
विसरायचे वार ।
Sanjay R.

No comments: