Saturday, November 8, 2014

" पसारा "

इकडन तिकडे
तिकडन इकडे
टोलवा टोलवी नुस्ती ।
गडबड गोंधऴ
नुसता पसारा
खुप झाली मस्ती ।
शांत बसाव आता
आली थोडी सुस्ती ।
Sanjay R.

असाच एकदा भटकलो मी
निर्जन अशा जंगलात ।
गाठ पडली वाघोबाशी
म्हणाला आहे मी रागात ।
प्रश्न जगण्या मरणाचा
विचार आला मनात ।
म्हटले निर्जन नाही ही जागा
तु राहतोस ना या जंगलात ।
Sanjay R.

सुर्याहुनही तेजोमय
रुप असे ग सखे तुझे ।
नको वाटे तप्त गोळा
सुखावतेस तु मन माझे ।
Sanjay R.




No comments: