Saturday, November 8, 2014

" चारोळ्या "

बघुन चित्र तुझे
लिहील्या त्या ओळी ।
कशी ग तु अशी
आहेस किती भोळी ।
Sanjay R.

लिहील्या चार ओळी
चित्रावर तुझ्या ।
नाही उरले शब्द आता
कवितेस माझ्या ।
Sanjay R.

हिच तर अदा तुझी
किती मला आवडते ।
नाही मन भरत
परत परत वेडावते ।
Sanjay R.

केव्हा येणार तु
कुशीत माझ्या ।
हात केसांतुन
फिरवायचा तुझ्या ।
आसुसले ओठ
का देतेस सजा ।
तुझ्याच आठवणीत
जगतो मी माझा   ।
Sanjay R.

नको ना ग रुसु
नको ना रागाउ ।
आहे माझ्याकडे
तुजसाठी खाउ ।
गीत प्रेमाचे
मिळुन ये गाउ ।
स्वप्नपरी तु माझी
मिठीतच राहु ।
Sanjay R.

लांब सडक
केस काळे तुझे ।
रुंद कपाळ
हरीणीचे डोळे तुझे ।
कसा मिरवतो
शेंडा नाकाचा
गोड गुलाबी ओठ तुझे ।
हळुच डोकावतो
तीळ तो काळा
गोड कीतीग हास्य तुझे ।

थंडीला होताच सुरुवात
मिळे लोकरी कपड्यांची साथ ।
करी ते थंडी वरती मात ।

नेत्रांना तुझ्या
कोर काजळाची
हरपले चित्त
ओढ त्या क्षणाची ।

नेत्रात तुझ्या मी बघतो जेव्हा
का स्तब्ध होते नजर अशी ।
निरखत राहतो मीच मला मग
क्षणात असतो तुजपाशी ।
साधतो संवाद नकळत असा
नजरच बोलते शब्दांशी ।
एकरुप होतो तु अन मी मग
बंधन जुळते शुन्याशी ।
Sanjay R.

No comments: