Wednesday, December 7, 2022

रॉकस्टार

प्रश्न आहे मोठा
आहे मी कोण ।
मुलगी म्हणते घरात
रॉकस्टार दोन ।

पप्पा आणि मम्मी
स्टार आहेत जीचे ।
अन मोठी ती फॅन
आहेत हिरो तिचे ।
Sanjay R.


अशी कशी ही नजर

अशी कशी ही नजर
म्हणती वाईट कुणी ।
वाटते सारखी भीती
जणू मागे लागला शनी ।

पडता ऐक नजर
कुणी होतो घायाळ ।
वाटे हवे हवे काही
अंतर होते मधाळ  ।

नजरेस मिळता नजर
हरपते कुणाचे भान ।
विसर पडतो सारा
नाही कश्यावर ध्यान ।

भुताटकीचा होई वार
लगता कुणाची नजर ।
लिंबू मिरची हवे मग
निघता निघेना असर ।

नजरेची किमया न्यारी
आहे किती ती भारी ।
डोळे उघडुन चाला
नजर नजरेस तारी ।
Sanjay R.


नजर ही ढळेना

डोळ्यात तुझिया जादू
नजर ही ढळेना ।
होऊन स्तब्ध मी जातो
माझे मलाच कळेना ।

डोकावून जातो विचार
रास तुझ्याशी जुळेना ।
आठवणीत असे सदा
का वेळ ती टळेना ।

भावनांचा येतो पूर
मन मात्र वाळेना ।
राख झालीत स्वप्ने
आठवण ही जळेना ।
Sanjay R.


लावू नको नजर

नजरेला तू लावू नको नजर
मनही माझे रे आहे इथे हजर ।

वाढली कशी श्र्वासांची गती
धडधडते हृदय नी अंतरात गजर ।

प्रेमाची लडिवाळ ही भाषा
स्मित हसू होते गालावर हजर ।

ओठही मग शोधतात शब्द
हळूच फुलते कळी सारून पदर ।

अंतरंगात कशी होते बरसात
बहरते तन नी वाटे मी अधर ।
Sanjay R.


शून्यात लागली नजर

शून्यात लागली नजर
मनात विचारांचे वादळ ।
भूत भविष्य दिसे सारे
गळती डोळ्यातून ओघळ ।

विश्वासाची तुटली तार
वाटे ही जीवनाची हार ।
मनाच्या होतात चिथड्या
आपलेच जेव्हा करतात वार ।
Sanjay R.