Thursday, December 9, 2021

नको करू वाद

नको आता वाद
करू या संवाद ।
हाक देताच मी
देशील तू साद ।
ओ ऐकण्या तुझा
करील मी नाद ।
मन होईल शांत
ऐकुनी प्रतिसाद ।
नसेल मग काळजी
मिळे मनास मिजाद ।
तुझी माझी जोडी
घेऊ जीवनाचा स्वाद ।


Wednesday, December 8, 2021

घडले उलटे सारे

काय करायचे ठरलेच नव्हते
उलटे घडणार ठाऊक होते ।

दोष कुणाचा या नशिबाचा
सरले सारेच नाते गोते ।

दिवस सम्पता अंधार होता
घेऊन प्रकाश चांदणी येते ।

चन्द्र कुठला अमावसेचा
तुटून मग ती तारा होते ।
Sanjay R.


नको रडवू

काय अडवू काय घडवू
शिल्प नाही काय जडवू ।
दुःखाचा तर सागर इथे
नको रे असा मला रडवू ।
शब्दांचे तुझे बाण अपुरे
पुरणार नाही, नको लढवू ।
मूर्ख नाहीच कोणी इथे रे
शहण्यासही तू नको फसवू ।
जगणे आता कठीण किती रे
चल दोघेही जगास हसवू ।
Sanjay R.

Tuesday, December 7, 2021

सांगा ना तुमी

सम्मेलनात भाऊनं माया, केली हो कमाल
हासू हासू पोट दुखलं,  आली लय धमाल ।

म्हने कवी न्हाय मी, वऱ्हाडीतच बोलतो
सांगानं तुमी बावा, म्हनांन तसा डोलतो ।

गर्व हाये मले बी, माया या वऱ्हाडीचा
कारखानदार मना मले, हाये या पऱ्हाटीचा ।

पिकवतो मी कापूस, मेहनत नाय कमी
एकच पाऊस धोका देते, सांगा ना तुमी ।

एकडाव भाऊ या ना, घर माह्य पाहाले
कुडाच्या भीती पत्र्याचं छप्पर, हाये हो राहाले ।

लहानश्या घरात सांगा, लोकं कितीक रायते
उली उली खाऊन, आग पोटाची जायते ।

बिमरिले आमच्या हो, न्हाई भेटत डाक्टर ।
बिना औषधीनच मंग, घेतो उरावर ट्रॅक्टर ।

पेरणीच्या घाती आमचा, सावकार बनते देव 
कर्ज फेडाले मातर, भाऊ वाटते हो भेव ।

पिकते हो थोडं बहुत, वावरात बी माह्या 
पाडून मांगते व्यापारी, फुटते मंग लाह्या ।

मिटन म्हनते गरिबी, पर कधी हो मिटन
कप्पच चिपकलं हाये, लाचारीचं किटन ।

महागाईनं पहा कसा, वासला हाये आ
घर कसं चालवाचं, सांगन का कोनी बा ।

लय झालं डोक्याभाईर का, सुचतच नाही
फास दिसते गया भोवती, सांगा तुमी काही ।
Sanjay R.


भाव भक्तीचा भुकेला

सांगू काय मी तुला
कळते सारेच रे तुला ।
तिन्ही लोकीचा तू ज्ञानी
दरबार तुझा रे खुला ।
यावे कोणी जावे कोणी
बंधन  नाहीत कुणाला ।
हवेच काय रे तुजला
भाव भक्तीचा भुकेला ।
आळवतो जेव्हा तुजसी
लाभते शांती मनाला ।
मार्ग सुखाचा तुझ्या दारी
नाही कमी कशाला ।
स्मरण करताच तुझेची
अमृत करतोस विषाला ।
Sanjay R.