Sunday, December 5, 2021

माणुसकी

सांगतो मी कथा माणुसकीची, लक्ष देऊन ऐका.

माणसातच असते ना माणुसकी, मग का माणूसच देतो माणसाला धोका.

स्वार्थाने केले घर मनात, भरायचा असतो तो रिकामा खोका .

पैश्या विना होते काय, हवे ते घ्यायला पैसा तुम्ही फेका .

महागाईने तर केला कहर, जीवन आता जगणेच आहे मोठा धोका .

मागे पडला तो गेला, जीवनाचा मंत्र हाच शिका.

कोण बघेल तुमच्याकडे, राहाल तसेच मग भिका.

जगायचे तर मान उंच हवी, सांगेल कोण शिका.

चला पुढे, पुढेच जायचे, विचार जास्त करू नका.

मार्ग आहे खडतर थोडा, येतील धोंडे मधे मधे,
ओझे आहे संस्कारांचे, उलटून ते फेका.

धीर नको, गंभीर व्हा. आक्रमकताही हवी थोडी.
क्रोध मोह मत्सर हवा टाकायचा तुम्हास डाका .

बेशरमकी तर हवीच हवी, दुर्गुणांना जरा जपा.
लाज नको, शरम नको, उर्मट होऊन टेका .

शरीरात आहे रक्त लाल, त्याचा कुठला धोका.
थोडे जरी सांडले तरी रंग पडेल कसा फिका .

अस्त्र असो वा शस्त्र असो, लढताना तर हवेच सारे. धीट व्हा,  निग्रही व्हा, काळीज काढून फेका .

काय हवे काय नको, सारेच तुम्ही लुटा.
उठा सारे जागे व्हा. मागे असे राहू नका .

आईस्क्रीम तुमच्याच हातात आहे. बघा तुम्ही चाखा.

Sanjay R.


Friday, December 3, 2021

माझा काव्य संग्रह प्रकाशित

https://shopizen.app.link/Pgxmvu2QElb


*माझा काव्य संग्रह शॉपिज़न. इन वर हार्डकव्हर रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. आपण शॉपिज़न एप किंवा वेबसाइटवर वरून ऑर्डर करू शकता*

शॉपिज़न एप डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.shopizen

शॉपिज़न वेबसाइट
 www.shopizen.in


भावना गेल्यात मरून

कारावे काय आता
भावना गेल्यात मरून ।
नाही उरले मनात
ठेऊ कसे मी धरून ।
जीवन झाले कठीण
करावे किती करून ।
मार्गच दिसेना आता
देतो सारेच सारून ।
Sanjay R.


Monday, November 29, 2021

काय म्हणतोस तू

काय म्हणतोस  सांग तू रे,
गालात मी हसू कसे रे ।

जमेल कसे ते सांग मजला,
तुही मलाच फसवू नको रे ।

तोंडात नाही एकही दात,
हसताना ते दिसवू कसे रे ।

चष्म्याची काच ही भिंग झाली
डोळ्यांना माझ्या रुसवू नको रे ।

गालावरती पडल्या वळ्या
दिसते तुला ती खळी कुठे रे ।

कानही सांगू तीक्ष्ण किती ते,
आवाज वाटतो सूक्ष्म किति रे ।

डोक्यावरती टक्कल पडले
उडणारे ते केस कुठे रे ।

उठणे होईना बसणे होईना,
कंबर झुकली, उभेच राहवेना ।

तलवार गेली लाठी आली,
हातात काठी दिसते कशी रे ।

बोल म्हणतो गोड किती रे
बोबडे शब्द ओठच गाती रे ।

सोळाची मी, तू सताराचा
वय किती ते सांगू कशी रे।

म्हातारपण हे कुठे थांबते
खो खो करणे थांबवू कसे रे ।

लाल पिवळे रंग फासूनी
सुंदर आता मी दिसू कशी रे ।

वाट पाहते होईल कधी मी
आकाशाची चांदणी मी रे
Sanjay R.


छळ

गुंतलो किती नात्यात या
माझाच मी मज छळतो ।
अंतरात या यातना किती
का असा मी मीच जळते  ।
शोधू कुठे मी गार वारा
कशास असा रे मज छळतो ।
इथे शोधू की तिथे शोधू मी
जीवन कसे हे मीच  पळतो ।
थांबू कुठे मी बळ हे सरले
आकाशातला तयार ढळतो ।
Sanjay R.