Saturday, April 25, 2020

" जीवन ऑनलाइन "

काय काय होणार ऑनलाइन
जग पुढे पुढे पळतय
नका राहू मागे व्हा तुम्हीही जॉईन
पैसा आणि बँका आहेत ऑनलाइन
खरेदी विक्री, देणे घेणे होते ऑनलाइन
जीवन बदलतंय होतंय ऑनलाइन
झाला माणूस किती बिझी
विसरला मैत्री नाते ओळख पाळख
विसरला परोपकार झाला स्वार्थी
उरलाच कुठे हो पर्याय सांगा
होतील आता लग्नही ऑनलाइन
मोबाईल वरूनच व्हायचे जॉईन
जुळले फळले तर मुखावर शाईन
उरतील थोडे त्यातही कॉइन
लागली आहे मोटठी लाईन
सारेच होईल आता फक्त ऑनलाइन ।
Sanjay R.




Friday, April 24, 2020

" मनातले सत्य "

भारी जातोय आता
रोज एक एक दिवस
डोकं झालं जड आणि
मन झालंय नर्व्हस ।

महिना लोटला आता
किती बसायचं घरात ।
कशी ही भीती जीवनाची
मृत्यू वाट बघतोय दारात ।

सरला पैसा सरले धान्य
प्रश्न उरला आता पोटाचा ।
कष्टासाठी आहेत हात
फक्त मार्ग हवा वाट्याचा ।

युद्ध आहे वा हे आक्रमण
पसरले विषारी संक्रमण ।
जीवनाचे आहेत मार्ग बंद
तरीही लढायचे आमरण ।

जातील हेही दिवस एकदा
सुखाच्या खुलतील वाटा ।
मनात मात्र असेल कायम
हृदयात रुतलेला तोच काटा ।
Sanjay R.



Thursday, April 23, 2020

" पुस्तक "

पुस्तक ज्ञानाचे भांडार
विचारांचा तो सागर
शब्द पुस्तका विना निराधार
अभ्यासकांचा तो आधार
आयुष्याचा उचलते भार
जीवनात देई बहार
मानू कसे मी आभार
पुस्तका विना जीवन अंधार
Sanjay R.




" घरीच राहा जाऊ नका बाहेर "

सगळेच आहेत घरात 
बघायचे उभे राहून दारात ।
महिना होत आला
भीती जीवाची मनात ।

बसून घरात हो आता आता 
बघायचा मोबाईल  टीव्ही ।
आदेश सगळे पाळायचे 
देईल जे जे हो तुमची देवी ।

खाऊन खाऊन वाढेल वजन
संभाळाल जरा थोडे पोट ।
कंट्रोल कराल खाण्यावर
समजू नका पोटाला मोट ।

जाईल कोरोना लवकरच 
नियम तुम्ही जर पाळाल ।
चढू जीवनाची शिडी परत
जर मोह आज  टाळाल ।
Sanjay R.


Tuesday, April 21, 2020

" का झालास तू वैरागी "

सोडून तू रे घरदार
का झालास वैरागी ।
सांग ना कुणासाठी
झालास तू असा त्यागी ।

काखेत झोळी तुझ्या
अंगावर वस्त्र एक भगवे ।
विचार आमचे कुत्सित
केले तुलाच रे नागवे ।

लोभ मोह माया मत्सर
सोडून तू असा निघाला ।
भावना क्रूर किती आमची
सम्पविले तुझ्या जीवाला ।

रक्षक झालेत  रे भक्षक
विश्वास करू मी कुणाचा ।
थांग लागणे कठीण रे
धगधगलेल्या या मनाचा ।

पेटली आहे आग आता
उरेल फक्त राख त्याची ।
माणूस मारेल माणसाला
लागली तहान रे रक्ताची ।

माणुसकीचा झाला अंत
कोण महात्मा कोण संत ।
रक्त पिपासू झालो आम्ही
नाही कसलीच आम्हा खंत

कोण निरपराध सांग इथे
अपराधी ही उन्मत्त झाला ।
भाव आता त्याच्या चरणी
तोच भोगी महान झाला ।
Sanjay R.