Sunday, September 8, 2019

" कैसे मनाऊ दिल तुझे "

कैसे मै मनाऊ तुम्हे
कैसे समाझावू तुम्हे ।
देखकर राह तुम्हारी
कुछ तो हो रहा हमे ।

हालत क्या दिलकी
कैसे कहू मै तुम्हे ।
ख्वाईश दिलमे मेरे
हसता देखू तुम्हे ।

दूर ना जाना कभी
साथ रहना हमे ।
मंजिल तो एकही है
पर खोना नहीं है तुम्हे ।
Sanjay R.

Thursday, September 5, 2019

" गुरू ज्ञानाचा सागर "

करून शिक्षित सोडिले
गुरुजी तुम्हीच आम्हा ।
परिश्रम गुरूजी तुमचे
सांगू कसे मी तुम्हा ।

अ आ इ ई पासून
झाली विद्येची सुरुवात ।
पाठ जीवनाचे गिरवले
शिकलो सारेच तयात ।

गुरूंची महिमा अपार
ज्ञानाचा ते सागर ।
जमेल तितकी आम्ही
घेतली भरून घागर ।

जीवनाची केली मग
त्यातूनच वाटचाल ।
गाठले उद्दिष्ट आम्ही
नसतील जरी विशाल ।

करतो नमन गुरुवर
ऋणी मी तुमचा पामर ।
तुमच्याविना नाही सिद्धी
पडेल कसा तुमचा विसर ।
Sanjay R.

Wednesday, September 4, 2019

" रस्त्यात रस्ता शोधा आता "

वाहतुकीचे आलेत आता
नवीन नवीन भारी नियम ।

भरावा लागेल दंड मोठा
जाईल बघा खिशाचा दम ।

बेल्ट बांधा, हेल्मेट घाला
पिऊच नका हो आता रम ।

वाहन चालवा हळू हळू
अपघात होतील थोडे कम ।

खाच खळगे रस्त्यात गड्डे
सरकारचाच प्रश्न अहम ।

देईल कोण दंड त्याचा
उतरवा अधि काऱ्यांचा भ्रम ।

अतिक्रमण तर झाले इतके
करायचे सहन होऊन मम ।

रस्त्यात रस्ता शोधा आता
पडाल झडाल होईल धडम ।

व्यवस्थेचे तर बघाच आता
प्राण जातात कुणाला गम ।

अश्रू पुसायला नाही कोणी
सरकारनेही घ्यावेत श्रम ।

जगणे मरणे हाती कुणाच्या
पण रस्त्यावरती नको मरण ।
Sanjay R.

Tuesday, September 3, 2019

" तऱ्हाच अनेक मनाच्या "

कुणास ठाऊक
मनात काय कुणाच्या ।
ठाव नाही लागत
तऱ्हाच अनेक मनाच्या ।
मधेच घेई उडान
पल्याड जाई आकाशाच्या ।
कधी आकार सुक्ष्म
मावे टोकावरती सुईच्या ।
आठवणींचा डॉगर इथे
कोपऱ्यात भरून मनाच्या ।
उठते काहूर कधी
थांग लागेना मनाचा कुणाच्या ।
Sanjay R.

Monday, September 2, 2019

" गणपती बाप्पा मोरया "

आले आज बाप्पा घरो घरी
आनंद उत्साह दाटला उरी ।

भाव भक्तीचा मनो मनी
वंदन जोडूनी हात दोन्ही ।

विद्या सिद्धीचे दैवत गणराया
हवी आम्हास तुमची छाया ।

नाद निनादतो मोरया मोरया
बोला गणपती बाप्पा मोरया ।
Sanjay R.