Friday, September 21, 2018

" लक्षण नाही बरं "

लक्षण माणसाचं ना नाहीच बरं
क्रोध त्याच्या मनातला
जसा आगीचा धग्धगणारा लोट
स्वार्थ इतका बोकाळला की
दिसतं त्याला फक्त त्याचंच पोट
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

कुणी इथे आहेत खूपच मिजाशी
आणि कुणी एक एक दाण्यासाठी
दिवस काढतात फक्त उपाशी
कुठे अन्नाचा चाले नासोडा
तर कुठे कोरभर भाकरीचा तुटवडा
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

उरलाच कुठे आता माणसात सदाचार
भ्रष्टाचार दुराचार व्यभिचार अनाचार
नाहीत फक्त हे लक्षणं चार
सरलेत सारेच माणसातले
आचार आणि विचार
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं

चोरी लबाडीत सगळे ध्यान
बुद्धी शुद्धी केली गहाण
ढोंगी बाबां झालेत महान
लुच्चे पुच्चे लफंगे गीरी
झाली आता आमची शान
लक्षण माणसाचं ना नाहीच बरं
Sanjay R.


Thursday, September 20, 2018

" बाप्पा "

दिवस झालेत पाच
बाप्पा तुम्ही आलात
सकाळ सायंकाळ चाले
पूजा आरती घरात

प्रसन्न किती वाटतं
दिवस जातो आनंदात
रूपं तुमची किती
अवतरता मूर्ती रूपात

हात दोन्ही जुळतात तेव्हा
स्थान भाविकांच्या मनात
आनंद वाहतो ओसंडून
जाऊच नका विसर्जनात
Sanjay R.


" ले गये होश "

ले गायी तुम
क्यू हमारे होश ।
और पुछती हो
क्यू हम खमोश ।
इंतजार है दिदार का
दिल होता मधहोश ।
Sanjay R.

हम भी आएंगे
जरूर तब
न होगी आंधी
न होगा तुफान
होंगे तुम हम
और बस प्यार
Sanjay R.

आज तो कान भी
तरस रहे थे
सुनने को तुम्हारे
दो शब्द ।
बस तस्वीर देखते रहे
और खो गये
तुम्हांरी आखोमे ।
Sanjay R.

Wednesday, September 19, 2018

" जी लो जरा "

बात दिलकी हो तो
ह्दसे गुजर जाते है लोग ।
जिंदगी यह है कितनी
दिलसे जी लेते है लोग ।

थोडा खुदभी हसलो
कूछ औरोकोभी हासावो ।
छोटीसी यह जिंदगी
प्यार कुछ तो जातावो ।

लौट के ना आएंगे ये दिन सारे
जी लो खुशी से हर एक दिन  ।
है सपनो की यह दुनिया
हंस हंस के जी लो हर दिन ।
Sanjay R.

Tuesday, September 18, 2018

" मायेचा सागर "

माय हाये माही मायेचा सागर
लेकरावर तीची भीर भीर नजर ।
सर न्हाई तीची कोणाले
करान कितीबी जागर ।
काळजालेच पहा इचरून
कसा फुटते पाझर  ।
जीवा परस केली तुही कदर
तवा झाला तू रे डगर ।
मोठ्ठा लय होय तू डगर वगर
पर भुलू नको तू माय चा पदर ।
ठिवजो बापू तिच्या मायेचा आदर
मांगनार न्हाई तुले थे तुह जिगर ।
Sanjay R.