Saturday, August 25, 2018

" देखो जरा इधर "

ना हारना ना तुटना
हसीन है ये जिंदगी ।
देखो तो जरा इधर
लाये है हम बंदगी ।
आखो मे देखो जरा
दिखेगी तुम्हे जिंदगी ।
आओ पास जरा तो
होगी साथ बंदगी ।
Sanjay R.

Friday, August 24, 2018

" जायचं का पावसात "

सखे दे हातात हात
होऊ दे मस्त बरसात ।
पौर्णिमेची चांदणी रात
तुझी आणि माझी साथ ।
जायचं का पावसात
काय तुझ्या मनात ।
बघ माझ्या डोळ्यात
सांग माझ्या कानात ।
Sanjay R.

Wednesday, August 22, 2018

" भावनांचा कल्लोळ "

मनात भावनांचा कल्लोळ
सारा विचारांचा घोळ

जशी अंतरात जाळपोळ
डोळ्याला आसवांचे ओघळ

कुठे कुणाची हळहळ
दिसे कुठे तळमळ

देखावाच जास्त
भासे त्यात सळसळ

सरलेत झरे निर्मळ
घाला शुद्धीची आंघोळ

तोडा स्वार्थाचा मंगळ
होईल जीवनात चंगळ
Sanjay R.


Tuesday, August 21, 2018

" बघ थोडं वळून "

बघ थोडं वळून
येईल तुला कळून

वर बघ आकाशात
काळं कुट्ट आभाळ
त्यातून डोकावतो
मंद मंद प्रकाश

मधेच कशा मिरवतात
पावसाच्या सरी
ढगा आडून अवतरते
जशी इंद्राची परी

गडगडते कधी आभाळ
लखलखते कधी वीज
चल जाऊ पावसात
सोबत माझ्या भिज

झालेत किती पावसाळे
आठवतात का तुला
मोजायचा होता पाऊस
सोबत तुझ्या मला

जाऊ नकोस पुढे
थांब ना थोडी गडे
धावू दे ढगांना
झालेत ते वेडे

बघ थोडं वळून
येईल तुला कळून
Sanjay R.


Saturday, August 18, 2018

" पेटले रान "

सुगंध गजऱ्याचा
झालो मी बेभान।
लागली आग मनी
हृदयात पेटले रान ।
Sanjay R.