Tuesday, March 27, 2018

" नभाचा साज "

झाले अधिर मन माझे
लागले वेध मनास माझ्या ।
शोधतो मी मलाच आता
अंतरात काय सांग तुझ्या ।

उडुन गेले ढग सारे
निरभ्र झाले आकाश आज ।
वाढली धग सुर्याची
लोपला त्या नभाचा साज ।

हिरवळ सरली पानही गळले
सळसळ वारा नाही किनारा ।
अंधार रात्री दुर आकाशी
शोधतो मीच तुटता तारा ।
Sanjay R.

Saturday, March 24, 2018

लेक माही लाडाची

असा कसा रे तु मानसा
नकु वाटे तुले लेक लाडाची ।

करु नकु रे असा फरक
देइन तुले थेच सावली झाडाची ।

गर्भामंदीच का करतो तिचा तु अंत
अशानं कसा रे होशीन तु निवांत ।

जलमा आंदिच धाडतो तु तिले
का होशिन रे तु असा मनानं शांत ।

भेद पोरा पोरीचा काउन करतं
सांग लावन कोन माया तुयाशी ।

आसवं पुसाले येयीन बापु थेच
रडनबी थेच घेउन तुले मंग उशाशी ।

नोको लोटु रे असा दुर तिले
हाये थेच एकली मुरती प्रेमाची ।

लाव थोडासाक जिव तिले
होइन जिवनाची तुया पुरती ।
Sanjay R.

Friday, March 23, 2018

" वारा "

भाव भावनांचा हा
खेळ सारा ।
मन मोहुन घेणारा
एक तारा ।
हलकेच स्पर्श करुन
जातो वारा ।
होउन रोमांचित उठतो
देह सारा ।
मनात फुलतो मग
मोर पिसारा ।
Sanjay R.

Wednesday, March 21, 2018

" सत्याग्रह "

पडतो का काही फरक
शांतिपुर्ण या सत्याग्रहानं ।
बळी जातोय शेतकरी
फळफळली किती नेतागिरी
बळिराजा तुझ्या मरणानं ।
Sanjay R.

Wednesday, March 14, 2018

" विचारी आमचा शेतकरी "

आहे लयच विचारी
गरीब आमचा शेतकरी ।

परी खोदुन आहे मोठी
दरी त्याच्या वाटेवरी ।

वरषानु वरषे चालली
असिच त्याची वारी ।

चोरायचाच गराडा आहे
सभोवताल त्याच्या दारी ।

संकटानी घेरले त्यास
पहा दिशा चारी ।

नाही निसर्गाचा साथ
व्यापारीही झाले भारी ।

पडतो पोटाला पिळा
उघडी नागडी मुलं घरी ।

कधी येशील रे धाउन
सांग तु देवा हरी ।

कधी होतिल का जागे
लोकं हे सरकारी ।

तुटेल नाही तर एक दिस
करा कोनितं काहितरी ।

आसवं डोळ्यात थबकले
एकेक दिवस जातो भारी ।
Sanjay R.