Monday, August 14, 2017

फाटका संसार

मोठे किती
हे घर आमचे ।
खाली धरती
वर आकाश ।
आडोशाला
आहेत दगड ।
पाउस पाण्याची
नाही चिंता ।
फाटका संसार
जिवनाची व्यथा ।
पोटाची भुक
जळती गाथा ।
Sanjay R.





Tuesday, August 8, 2017

" आनंद "

मैत्रीचा एक हात
सार्या जिवनाची साथ ।
चढ उतार जिवनातले
करुन त्यावर मात ।
जगायचं सारं आयुष्य
रोज नवी प्रभात ।
जावं लागेल सोडुन
कधी एक क्षणात ।
तोवर हसायचं
खुप खुप आनंदात ।
Sanjay R.

Thursday, August 3, 2017

" मनच जळलं "

कसं कुणास ठाउक
पण आज कळलं
माणसाचं ना
मनच जळलं ।
माणसांनी माणसांना
किती छळलं ।
माणुसकी बघुन
सारं जग हळहळलं ।
माणसाचं ना
मनच जळलं ।
वाटलं होतं
संकट टळलं ।
आलेलं तुफान
मागच्या मागे वळलं ।
विचारांचं आवरण
कित्ती मळलं ।
माणसाचं ना
मनच जळलं ।
Sanjay R.

Wednesday, August 2, 2017

" हो गयी रात "

ढल गया दिन
हो गयी रात
न जाने कब होगी
उनसे मुलाकात ।
आज दिलमे है
कुछ मनकी बात ।
चांद को मीला
चांदनी का साथ ।
मिले जब दोनो
हातो मे हात ।
ढल गयी रात
अधुरी मुलाकात ।
दिल मे रह गयी
दिल की बात ।
साथ सुरजके
फिर एक शुरुवात ।
कब होगी रात
होगी कब मुलाकात ।
Sanjay R.

" मनमोहना "

मनमोहना सुर तुझ्या बासरीचे
कीती मोहविती मजला ।
स्वरांच्या मैफलीत झाले मी सुर
शोधते तुजला ।
Sanjay R.