Sunday, August 14, 2016

" रोजच उपवास "

मनी एक ध्यास
सोबत विश्वास ।
एक एक श्वास
जिवनाचा प्रवास ।

खळगी पोटाची
रोजच उपवास ।
भुकेचे कीती मोल
डोळ्यात आस ।

का कुणास
पैसाच खास ।
नको नाती गोती
लोभ मानवास ।

ना उरली माणुसकी
लागे ओठचा घास ।
तहान तया रक्ताची
झाले सारे राक्षस ।
Sanjay R.

Saturday, August 13, 2016

" मन फुटकी घागर , लागे भराया सागर "

मन अधर अधर
पाण्याची फुटकी घागर ।
भरा कीतीही तयासी
मागे अख्खाच सागर ।
देता थोडके सादर
चाले सदा ची घरघर ।
दुखाःचा नाही तोटा
डोळी आसवांचा पुर ।
सुख क्षणाचा सोबती
घेतो जगुन मधुर ।
Sanjay R.

Friday, August 12, 2016

" मस्तीत जगायचं "

मनाचं काय
कसं कुणी सांगावं ।
क्षण सुखाचे
आनंदात छान रहावं ।
गीत सुमधुर
ओठात गुणगुणावं ।
हास्याची छटा
प्रसन्न मुख भासावं ।
व्यक्त होतांना
खळखळुन हसावं ।
क्षण जिवनाचा
मस्तीत जगावं ।
Sanjay R.

Thursday, August 11, 2016

" श्रावण सरी "

आला आला
पाउस आला ।

क्षणात कीती
भिजउन गेला ।

सुर्यही पावसात
चिंब न्हाला ।

झाडांना मग
हुरुप आला ।

हिरवा शालु
ओला झाला ।

गुलाब मोगरा
सुगंध फुलला ।

चीउ काउचा
आवाज खुलला ।

श्रावण चहुओर
मस्तीत उधळला ।
Sanjay R.​

Wednesday, August 10, 2016

" विरह "

" विरह "

सोबत तुझ्या असतांना
येते भरती आनंदाची ।

घेतो भरारी दुर गगनी
उघडुन दारं ह्रुदयाची ।

नसतेस ना तु जेव्हा
होते घालमेल मनाची ।

वेळ कसा तो जातच नाही
मोजमाप करतो क्षणांची ।

डोळ्यांपुढे तुच असतेस
नसतेच तमा कशाची ।
Sanjay R.