Saturday, February 20, 2016

" क्या हम भुल पायेंगे "

हम आपको क्या
कभी भुल पायेंगे ।
वक्त आ जाये तो
खुदको भुल जायेंगे ।

हर रोज हम याद
आपको करते है
उठते जागते और
सोते हर क्व्खाब मे ।

ना भुले है अब
ना कभी भुल पायेंगे ।
यादे आपकी देखो
बसी है हर एक सासोमे ।
Sanjay R.

हो जाने दो जो होता है
आवाज जब दिलकी हो ।
गहराइसे सुनो जरा
दीलही दिलमे समाता है ।
Sanjay R.

Friday, February 19, 2016

" परत तीच सकाळ "

असतात जिवनाला कथा
भरभरुन असतात व्यथा
पार करायच्या सार्याच
होउन सामोरे स्वत:
बांधुन टाकायची सारी
दुखा:ची संपुर्ण गाथा ।
जगायचे जिवन आनंदाने
करुन हसरा ताठ माथा ।
Sanjay R.

घण घण वाजे घंटा
झाली आता सायंकाळ ।
दुर तो दिसतोय ना धुर
पेटतो तिथं जिवनाचा जाळ ।
कष्ट करुन थकले हात
घरी रडतय तान्हुलं बाळ ।
दोन घासांच्या पोटा साठी
बेंबीची ती तुटते नाळ ।
रोज हाती मरण घेउन ।
उगवते परत तीच सकाळ
Sanjay R

Thursday, February 18, 2016

" गजर "

अगणीत विचार
होतात इथे सादर ।
जोशात कधी कधी
विसरतो जनांचा आदर ।
तोलुन मापुनच करा
विचारांचा गजर ।
जोरात नका वाजवु
नकोसा तो बझर ।
Sanjay R

Sunday, February 14, 2016

" दिवस प्रेमाचा "

वाटतं मला रोज
खुप प्रेम द्यावं ।

तितकच प्रेम
आपणही घ्यावं ।

जिवनात दुख:
असेल नसेल ।

विसरुन सारं
खुप हसावं ।

सगळं आयुष्य
आनंदात जगावं ।
Sanjay R.

क्या बच्चे
क्या बुढे ।
व्हॅलेंटाइन डे
आहे आज
चला पुढे पुढे ।

उरले आयुष्य
थोडे थोडे ।
उडवु रंग
गुलाबी पुढे ।
Sanjay R.

Saturday, February 13, 2016

" आठवण "

आठवण तुझी येताच
गोड आभास होतो ।
आनंदाच्या भरात मग
तुझाच मी श्वास होतो ।

दिवस कुठलाही असो
तुझ्यासवे खास होतो ।
नसली ना तु तर मला
फारच गं त्रास होतो ।

तुझ्या माझ्या सोबतीचा
इतकाच सहवास असेल ।
जेव्हा नसु दोघेही आपण
कुणास कुणाचा त्रास नसेल ।
Sanjay R.