मराठीत माणुसकी, हिंदीत इन्सानियत, तर इंग्रजीत ह्युमिनिटी किती साधा, सरळ आणि सोपा वाटणारा हा शब्द आहे.
पण याच शब्दाला जर आपल्या हृदयात, आपल्या मनात, किव्वा आपल्या मस्तिष्क मधे जर स्थापन करायचे असेल तर.
खूप कठीण वाटते ना. खरंच हे इतके कठीण आहे का ?
हो हे फार कठीण असे कृत्य आहे. किमान आजच्या या धकाधकीच्या जीवनात तरी खूप कठीण आहे.
आता कालचीच गोष्ट बघा, रस्ता गजबजलेला , माणसं, बाया, मुलं , यांची धावाधाव चाललेली. रस्त्याच्या बाजूने विक्रेत्यांनी जागा व्यापलेली. तिथल्या आवाजाने असे वाटावे की किती हा गोंधळ. किती ही गडबड.
कशी मुंग्यासारखी माणसे सारखी पळताहेत. क्षणाक्षणाला गर्दी बदलतेय. कुठून इतकी माणसं येतात नी कुठे जातात, कळेनासे होते पण, प्रत्येक जण इतका घाईत असतो की, तो आपले अस्तित्वच विसरतो.
आजुबाजुला काय होतंय याच्याशी त्याला काहीच देणे घेणे नसते. कुणी पडला काय, कुणी अडला काय, किव्वा कुणी रडला काय, काही सोयरसुतक नाही.
चालता चालता रस्त्यात येकाचा अपघात झाला.
पाई पाई रस्ता क्रॉस करताना, बाईक वाल्याने त्याला उडवले. तो एका कडेला तर बाईक वाला दुसऱ्या कडेला पडले. दोघांचेही नशीब चांगले , पडले आणि स्वतःच धडपडत, आपले हात पाय चाचपडत, कसेतरी उठले. आणि आपापल्या दिशेने चालायला लागले. ना कुणी कुणाची विचारपूस केली. ना कुणी मदतीला धावले. स्वतःचे स्वतः ला सांभाळले, उठले आणि चालायला लागले, चुकी दोघांचीही असल्याने वाद, विवाद, मारामारी झाली नाही बस इतकेच. नाहीतर अजून काही तरी वेगळेच बघायला मिळाले असते. पण दोन तीनशे च्या त्या तिथल्या गर्दीत कुणालाच काही देणे घेणे नव्हते. सगळेच दुर्लक्ष करत आपल्याच धुंदीत जात येत राहिले.
मग सहजच मनात आले, हीच का ती माणुसकी ?
कदाचित या ठिकाणी थोडा वेगळा सिन असता तर ?
तरीही काही वेगळे असे घडले नसते. दोन चार थोडे फुरसती असणारे लोक , बिनधास्त खिशातून मोबाईल काढून व्हिडिओ बनवत राहिले असते किव्वा वाहन चालका वर ओरडत किव्वा त्याला चोप देत राहिले असते.
येवढे मात्र नक्की की, कुणाला मदतीची गरज असती तर त्याला ती कुणीच दिली नसती. सारेच आपापल्या तंद्रीत धावत राहिले असते.
ही एवढीच माणुसकी आता उरलेली आहे.
आपण आपल्या घरा शेजारी किव्वा गावात ही बघतो की ज्याची आपल्याला गरज पडू शकते , किव्वा जो अडचणीत आपल्या मदतीला धावून येऊ शकतो त्यालाच ते मदत करतात. धाऊन जातात. कारण तिथे दोघांचाही स्वार्थ लपलेला असतो. आणि म्हणून ते एकमेकांना धरून असतात.
तो माझ्या मदतीला येऊ शकणार नाही तर मग मी का मदत करावी असा सरळ सरळ हेतू ठेऊनच लोक वागत असतात. यात माणुसकी म्हणून कुठे काहीच नसते.
असतो तो फक्त आणि फक्त स्वार्थ.
यात दोष कुणाचा म्हणावे तर . मलातरी वाटते यात दोष कुणाचाच नाही. आजचे जीवनच त्याला जवाबदार आहे.
आपल्या गरजा, आपले हित, पैसा कमावण्याची होड या साऱ्यामध्ये माणसाने स्वतःला इतके गुंतवून घेतले आहे की त्याच्याकडे वेळच उरला नाही.
वेळेवर उठायचे, धावत पळत तयारी करायची. वेळेवर कामावर पोचायचे. काम आटोपून परत घरी पोचायचे, घरातली कामं उरकायची, नी थकून भागून झोपी जायचे.
जास्तीचा वेळ कुणाकडे उरतच नाही. जो तो घड्याळीच्या काट्यावर नुसता धावत असतो. ती त्याची मजबुरी झालेली आहे. आणि या धावा धावित तो आपले संस्कार , आचार, विचार, हित, अहित सारेच विसरला.
त्यात त्याला आजूबाजूच्या घडामोडीत लक्ष द्यायलाही वेळ उरला नाही. असाच धावत पळत जगतो. हेच त्याचे जीवन झाले आहे. या पळापळी पुढे तो हतबल झालेला आहे. आणि त्यामुळे मनात असूनही तो इतरत्र लक्ष देऊ शकत नाही. कुणाचा विचार करू शकत नाही. किव्वा कुणाला मदत देऊ शकत नाही.
हीच ती प्रवृत्ती माणसाला बदलावत चालली आहे. माणुसकी संपुष्टाला लागली आहे. या सोबत तो आपली संस्कृती, आचार, विचार दया, माया, प्रेम हे सारेच विसरत चालला आहे.
यात दोष शोधला तर तो त्या माणसाचा कमी आणि त्याच्या मजबुरीचाच जास्त दिसेल.
अन्यथा साधे किडा , किटुक, प्राणी, माणूस यांचे दुःख बघून तळमळणारा , हळवा होणारा, तत्परतेने मदतीला धावणारा माणूस इतका असाच सहज सहजी कसा बदलेल.
आपल्यातली माणुसकी कसा विसरेल.
प्रश्न खूप मोठा आणि गहन विचार करायला लावणारा आहे. जग बदलत आहे. सोबतीला माणूसही बदलत आहे.
संजय रोंघे, नागपूर.
मोबाईल - 8380074730
No comments:
Post a Comment