Thursday, July 21, 2016

" पर्यावरण आणी आम्ही "


     आम्ही जिथे राहतो तीथे आमच्या आजुबाजुला जर थोडी नजर टाकली तर आम्हाला आमच्याच कर्तुत्वाचे दर्शन घडेल ।
पण आम्ही त्या सगळ्याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत पुढे चालतो ।एक दिवस हेच आमचे दुर्लक्ष आम्हास भक्ष करुन टाकेल यात काहीही  संशय नसावा ।
     आम्ही आमच्या घरातला कचरा कचरा पेटीत न टाकता सरळ रस्त्याच्या कडेला टाकतो । आणी परीसरात घाण करवुन घेतो ।
आम्ही आमच्या रोजनीशीच्या सवयींना पण
इतके आळशी आणी विवेकहीन करवुन पाकले आहे की आमचेच आम्हाला पर्यावरणाचे भान राहीलेले नाही ।
     कचरा फेकणे कुठेही थुंकणे नको त्या वस्तु जाळुन धुर करणे प्लाष्टीकचा वापर आणी ते कुठेही फेकणे अनाठायी विजेचा वापर अशा अनेक गोष्टींवर आम्ही जर नियंत्रण मिळविले तर नक्कीच आम्ही पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करु शकु ।

     आपण थोडे जर औद्योगीक क्रुतींकडे लक्ष टाकले तर पर्यावरणाचा नाश करण्यात त्यांचाही वाटा सगळ्यात मोठा आहे हे लक्षात येयील ।कारखाने दिवस रात्र वर्षो ... न गणती पर्यावरणाशी खेळत आहेत । त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण उरलेले  नाही असे लक्षात येयील । कायदे आहेत पण ते सारे पैशापुढे लोळण घेतात । यथा राजा तथा प्रजा ।आमचे सरकारही काही करु इच्छीत नाही । युरोप अमेरीकेत पर्यावरणाचे कायदे फार कडक आहेत । म्हणुन तिकडचे सारे प्रोसेसींग युनीट्स भारतात आणी इतर आशियन देशात स्थलांतरीत होत आहेत। आणी आम्ही आपल्या हाताने आपल्या पर्यावरणाचा विनाश करुन घेत आहोत । या बाबींकडे आम्ही आणी आमच्या सरकारने लक्ष द्यायला हवे । राष्ट्राचा विकास साधताना पर्यावरणाचा बळी जाता कामा नये । नाहितर सगळे संपल्यावर रडायलाही कोणी उरणार नाही ।
तेव्हा आपण आज शपथ घेउ या की आम्ही सारे मिळुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासमदत करु या ।
जय भारत ।
स्वच्छ भारत ।

sanjay Ronghe
Nagpur

No comments: