माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या नोव्हेंबर 2023 च्या मासिक अंकात माझी रोजच इथे दिवाळी कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.
नवीन एक स्तंभ
नवीनच आरंभ ।
स्त्री ची भागीदारी
राजकारण अगडबंब ।
कुणास ते पसंत
मनी कुणाच्या खंत ।
वारा तर वाहतो
पण किती संथ ।
होऊ दे एकदाचे
रणांगणात बंड ।
नाही येणार मागे
वाट ही अखंड ।
असू दे पायरी
काढतील त्या धिंड ।
शिखरावर दिसेल
स्त्री शक्तीचा दंड ।
Sanjay R.