Thursday, March 2, 2023

राजाची राणी

कळेना मजला
कोण राजा कोण राणी ।
शोधूनही मिळेना
काही कशाची निशाणी ।
उरली फक्त आता
ती जुनी कहाणी ।
ऐकायलाही मिळेना
इथे बालक कोणी ।
मोबाईल मधे सारे गुंग
येते डोळ्यात पाणी ।
Sanjay R.


राजा राणी

ऐक सुंदर कहाणी
त्यात राजा राणी ।
सगळे सुखी
नाही दुःखी कोणी ।
खूप पिके धान्य
मुबलक होते पाणी ।
संपन्न तिथले लोक
सोन्याच्याच खाणी ।
फिरले ग्रह सारे
लागला मागे शनी ।
ताटातूट झाली
कुठे राजा कुठे राणी ।
पडेना आता पाऊस
डोळ्यात भरले पाणी ।
दुःख आणि दारिद्र्य
दिसे तीच निशाणी ।
Sanjay R.


Wednesday, March 1, 2023

भावनाहीन आयुष्य

उरल्याच कुठे भावना
आयुष्याचा झाला खेळ ।
मागे वळून बघणार नाही
सरली आता ती वेळ ।

आयुष्य गेले निघून
कुठे बसला कशाचा मेळ ।
क्षण आता उरलेत कमी
नको वाटतो सगळा छळ ।

अंतिम क्षणी एकच इच्छा
हे मजला थोडे बळ ।
पुसून टाकील आठवणी
मृत्यू तर आहेच अटळ ।
Sanjay R.

भावनांची झाली राख

उजाडले हे आयुष्य
भावनांची झाली राख ।
क्षण आता तो आला
नाही कुणा कुणाचा धाक ।

ओसाड पडली शहरे इथली
माणसांचा नाही कुठे पत्ता ।
जिकडे तिकडे आगीचे डोंब
काळया आभाळाची तिथे सत्ता ।

वर्चस्वाची ही लढाई
कोण मोठा कोण महान ।
मातीत मिळाले सारे काही
नाही उरले कुणास भान ।
Sanjay R.


नजरा इथे विषारी

नको बघू काही
नजरा इथे विषारी ।
नको बोलू काही
शब्दही इथे दुधारी ।

ठाऊक कुणास चव
विषाची नको परीक्षा ।
जो तो दिसे इथे
घेऊन जहरी दीक्षा ।

आभास असतो सारा
वाटे अमृताची धारा ।
बघूनच ठेवा पाऊल
नाही कळणार इशारा ।
Sanjay R.