Sunday, November 6, 2022

तू सुंदरा

सौंदर्यवती तू सुंदरा
काय तुझी ही तऱ्हा ।

रूप अविस्मरणीय हे
हिरवी हिरवी धरा ।

रंगांची उधळण इथे
धुंद गन्ध घेतो फेरा ।

पक्षी गुणगूणती गाणे
वाटे मजला ती स्वरा ।

झुळझुळ वाहे पाणी
मेघ बरसतो जरा जरा ।

निळे निळे आकाश वर
लुकलुकती सूर्य चन्द्र तारा ।
Sanjay R.


अविस्मरणीय सौंदर्य

काश्मीर चे सौंदर्य
अविस्मरणीयच आहे ।
स्वर्गाशी तुलना करता
संशय कुणास नाही ।

हिमालयाच्या रांगा
त्यावर बर्फ पांढरा ।
फुलांच्या बागा सुंदर
वारा थंड बोचरा ।

आकाशातून हिमवर्षा
निसर्ग वाटतो देखणा ।
भारताचे ते नंदनवन
वाटते जावे पुन्हां पुन्हा ।
Sanjay R.


वृक्ष

वादळ असो वा वारा
सोसतो सारे वार ।
एकटाच तो लढतो
झेलतो सारे प्रहार ।
कधी वेगाने हलतो
स्वतःच मग झुळतो ।
डौलाने मग होऊन उभा
आनंदात डुलतो ।
आपल्याच नादात मग
पिसाऱ्यागत फुलतो ।
एकाकी तो वृक्ष
जागेवरच हलतो ।
Sanjay R.

एकांत

एकाकी जगण्यात काय मजा
ती तर झाली मोठी सजा ।

नाही कुणी बोलायला
नाही काहिच बघायला

नजर दूर आकाशात
आणि विचार चले मनात ।

हसा हसवा मस्त जगा
एकांताचा फेका झगा ।
Sanjay R.


एकटेच जायचे

जीवनाचे हेच सत्य
एकटे यायचे एकटेच जायचे ।

आयुष्यभर खपून सारे
हवे नको ते जमवायचे ।

अनंत यात्रेला निघाल्यावर
इथेच सोडून सारे जायचे ।

लोभ मोह माया मत्सर
सगळेच सोबत बाळगायचे ।

आपलेही कधी जातात दूर
सांगा सोबत काय घ्यायचे ।
Sanjay R.