Monday, October 3, 2022

साथ तुझी

नाही मी एकटा
आहे साथ तुझी ।
असताना सोबत तुझी
करू कशास मी
काळजी माझी ।
Sanjay R.


मन भरले नाही

अजून मन भरले नाही
उरलं अजून करायचं काही ।
इच्छांचा तर सागर मनात
केव्हा होईल ते कळत नाही ।

पूर्ण कधी कुठे होते सारे
प्रयत्नानी आवरायचे पसारे ।
मिळेल त्यात आनंद माना
सुखी जीवनाचे तेच इशारे ।
Sanjay R.


बेभान हे मन

नवरंगाने नटली ही
आभाळाची काया ।
धगधगता सूर्य बघा
सरली त्याची माया ।

वारा गार छेडतो मज
झाले बेभान हे मन ।
पदर थांबेना खांद्यावर
सांग झाकू कसे मी तन ।

कसे सांभाळू मी मज
नजरेत भरला ज्वर ।
दूर सळसळली वीज
आली धावून सर ।
Sanjay R.


मातेचे गुणगाण

नवरात्री चे आयोजन
माँ दुर्गाचे करू नमन ।
अंबा जगदंबा तू काली
माते कीर्ती तुझी महान ।
दुराचाऱ्यांचा करी विनाश
अष्टभुजा ग तुझीच शान ।
मनोकामना होई पूर्ण
करील जोही तुझे ध्यान ।
जय आंबे जय जगदंबे
भक्तिभावे करतो गुणगान ।
Sanjay R.


Sunday, October 2, 2022

विचार बापूंचे

सत्याचा होतो विजय
असत्याने काय हासील ।
स्वातंत्र्याचा जिंकला लढा
अहिंसेचा मार्ग सुशील ।

अस्पृश्यतेचा सोडा विचार
स्वावलंबी सारे व्हा तुम्ही ।
प्रेम देऊनीया प्रेम घ्या
मंत्र बापूंचा पाळू आम्ही ।

स्वदेशीचा करा स्वीकार
विदेशील देऊन नकार ।
आत्मविश्वास जाणा जरा
होऊ नका असे लाचार ।

ऑक्टोबरची तारीख दोन
स्मरण करू आज बापूंचे ।
स्वातंत्र्याचे रक्षण करुनी
नमन करू त्या वीरांचे ।
Sanjay R.