Wednesday, August 3, 2022

दरवळला गंध

मोगरा फुलला
घेऊन सुगन्ध ।
संथ झाला वारा
दरवळला गंध ।

हळुवार श्वास
वाहे मंद मंद ।


मन माझे झाले
कसे धुंद बेधुंद ।

नजर शोधते
लागला छंद ।
सुटला मनाचा
हळुवार बंध ।

वारा झाला धुंद
मीही बेधुंद ।
अंतरात भरला
मोगऱ्याचा गंध ।
Sanjay R.



रहस्यमयी जत्रा

कुणी कुणाशी बोलेना
जागेवरून हालेना ।

रहस्यमय ती होती जत्रा
भुताटकीची वाटे यात्रा ।

अचानक मग गोंधळ झाला
मृत आत्म्यांना चेव आला ।

जो तो पडला तुटून असा
बदल माणसात झाला जसा ।

माणुसकीला विसरले सारे 
राक्षसांचे घुसले वारे ।

गिधाड होऊन माणसात आले 
स्वर्ण पदक ते मिरवू लागले ।
Sanjay R.

Tuesday, August 2, 2022

रात्रीचा आभास

सरतो दिवस जेव्हा
वाटते उदास ।
आठवण येताच मग
संथ होतात श्वास ।

थांबतात विचार सारे
लागतो मनाला ध्यास ।
उतरेना गल्या खाली
दोन सुखाचे घास ।

तळमळत जाते रात्र
स्वप्नांचा सारा आभास ।
मिटतो गच्च डोळे 
भोगतो फक्त त्रास ।
Sanjay R.


मैत्री कट्टा

सांजवेळ होता
थांबवेना घरात ।
मन आत बाहेर
येरझारा होतात ।
गप्पांचा भरे अड्डा
मित्र सारे जमतात ।
चुकत नाही वेळ
सारेच भेटतात ।
निघे सारा थकवा
उत्साह भारतात ।
मित्रांची मैत्री बघा
मैत्रीसाठी जगतात ।
Sanjay R.


ओली ही सांजवेळ

ओली ही सांजवेळ
सरसर पडतात सरी ।
आकाशाने पांघरली
ढगांची ओली दरी ।
भिजली धरा त्यात
ओल्या मातीची जरी ।
सळसळ वाऱ्यासंगे
नाचते हिरवी परी ।
सूर्यास्ताची वेळ झाली
सूर्य पोचला अपुल्या दारी ।
दूर मंदिरात वाजे घंटा
नाद उठला जय जय हरी ।
Sanjay R.