Monday, May 2, 2022

कागदाची बोट

गडगडता आभाळ सारे
कशी वीज दूर धावे ।
ढगांनी झाकले आकाश
सूर्याला कळेना कुठे जावे ।


पडत होता पाऊस रिमझिम
वाटे मस्त पावसात भिजावे ।
चिंब चिंब पावसात होऊन
मनसोक्त अंगणात नाचावे ।

बोट कागदाची सुटली जेव्हा
वाटे संगे तिच्या धावावे ।
गीत पावसाचे गोड किती
भिजत नाचत आनंदाने गावे ।
Sanjay R.


जीवनाची कविता

शब्दांना जुळती शब्द
चार ओळींची कविता ।

आयुष्यच पडे अपुरे
संपेना लिहिता लिहिता ।

रोज सूर्याची असे साक्ष
रात्री चांदण्यांची सरिता ।

सुखदुखाच्या आठवणी
अंतरात जणू ती गीता ।

अर्थाचे कधी होती अनर्थ
घडे त्यातून मग कथा ।

पुसून डोळ्यातली आसवे
मिटते कुठली व्यथा  ।
Sanjay R.


Sunday, May 1, 2022

गडबड घोटाळा

करा कितीही धडपड
शेवटी होतेच गडबड ।
बसतो मग गुपचूप
आपोआप थांबते बडबड ।
होते जिथे गडबड
तिथेच होतो घोटाळा ।
शांततेत घडते सारे
फक्त गडबड टाळा ।
Sanjay R.

Saturday, April 30, 2022

करतो एकांत मज इशारे

खेळ झाला जीवनाचा
सुख दुःख सरले सारे ।
होऊनिया चन्द्र आता
बघत असतो फक्त तारे ।
उजेडाची वाटते भीती
काळोखात घेतो फेरे ।
दूरदूर ती असते शांती
करतो एकांत मज इशारे ।
Sanjay R.


Friday, April 29, 2022

आभास

सांग ना मला जरा
तुज आभाळ म्हणू की आकाश ।

दूर जरी असेल तू
सदा वाटे मज तूच माझा प्रकाश ।

चन्द्र सूर्य तारे नकोत
डोळे मिटुनही मज होतो आभास ।

जपल्यात मी आठवणी साऱ्या
भरभरून त्यात जीवनाचा सारांश ।
Sanjay R.