Saturday, April 30, 2022

करतो एकांत मज इशारे

खेळ झाला जीवनाचा
सुख दुःख सरले सारे ।
होऊनिया चन्द्र आता
बघत असतो फक्त तारे ।
उजेडाची वाटते भीती
काळोखात घेतो फेरे ।
दूरदूर ती असते शांती
करतो एकांत मज इशारे ।
Sanjay R.


Friday, April 29, 2022

आभास

सांग ना मला जरा
तुज आभाळ म्हणू की आकाश ।

दूर जरी असेल तू
सदा वाटे मज तूच माझा प्रकाश ।

चन्द्र सूर्य तारे नकोत
डोळे मिटुनही मज होतो आभास ।

जपल्यात मी आठवणी साऱ्या
भरभरून त्यात जीवनाचा सारांश ।
Sanjay R.



नकोच मला तो एकांत

कुठला कशाचा एकांत
वाटतो मला तो अंत ।

असंख्य विचार येती जाती
मन कुठे असते हो निवांत ।

नको नको ते मग सुचते
वाटते माझी मलाच खंत ।

माणसांच्या घोळक्यात बरा
नाहीच व्हायचे मला संत ।

मित्र मैत्रिणी हवेत सारे
नकोच हो मला तो एकांत ।
Sanjay R.


Thursday, April 28, 2022

मनात उद्याची आशा

मनात उद्याची आशा
घालवू कशी निराशा ।
वाट दूर ही जाते कुठे
कळेना कुठलीच दिशा ।

स्वप्न जेव्हा मी बघतो
असते वेगळीच नशा ।
वास्तवात कळती मज
मिटलेल्या पुसट रेषा ।

का चाले वणवण सारी
सरेल कधी मनाची तृषा ।
भोग भोगतो मी जन्माचे
लुप्त होईल सारी आशा ।
Sanjay R.


Wednesday, April 27, 2022

विठ्ठला

हात गुंतले कामात
मुख हे हरी नामात ।
डोळे शोधती विठ्ठल
आस दर्शनाची मनात ।
दूर इतका तू पंढरी
जावे वाटे मज क्षणात ।
धारूनिया पाय तुझे रे
अर्पावी आसवे चरणात ।
आठवण येण्यास सदा
ठेव मजसी तू दुःखात ।
Sanjay R.