Saturday, February 19, 2022

राजा शिवाजी

मावळ्यांचा तू सखा
तू मराठ्यांचा राजा ।

मावली तुझी जिजाई 
धान्य ती तुझी आई ।

हिंदवी स्वराज्य स्थापिले
कित्येक खान लोळविले ।

स्वप्न तुझे ते सुराज्याचे
आहेत आता खांदे आमुचे ।

संजय रोंघे

डोळ्यात दिसे आसवं

चेहरा केविलवाणा
डोळ्यात दिसे आसवं ।
हृदयात माया ममता
म्हणू कसे मी ते फसवं ।

होऊन अस्वस्थ जरासा
शोधला त्यात मी अर्थ ।
नाही कळले मलाही
होता लपलेला स्वार्थ ।

बघून मजला तो हळवा
हळूच हसला मनात ।
देऊनी हात मी तयास
फसलो कसा रे गुन्ह्यात ।

विश्वासाचे भूत कसे ते 
डोक्यात अजूनही नाचते ।
व्यर्थ चिंता या मनाची
का बघून मलाच हसते ।
Sanjay R.

Friday, February 18, 2022

अंधाराची वाटते भीती

अंधाराची वाटते भीती
उजेडातही राक्षस किती ।
दिसेना रात्रीत काही
दिवसाला कापतात फिती ।
Sanjay R.

Thursday, February 17, 2022

ते दिवस जुने

येतील का परत

ते दिवस जुने ।
मित्रांशीवाय बघा
वाटते किती सुने ।

शाळा कॉलेजमधली
आठवते ती मस्ती ।
कामाच्या व्यापात
चढली आहे सुस्ती ।

मेहनत दगदग हो
किती करायची ।
उरलेच दिवस किती
तयारी करा मरायची ।

तरी एकदा वाटते
जगावे ते दिवस ।
सांग ना देवा तुला
करू कशाचा नवस ।
Sanjay R.




Tuesday, February 15, 2022

कसे हे स्वप्न

बघू काय कसे मी स्वप्न
विसरलो मनास जपणं ।

आशा आता मावळल्या
नशीबातच आहे खपणं ।

नाही गालावर हास्य
डोळे पुसतच रडणं  ।

नाहीं आधार कशाचा
ठाव मजला पडणं ।

नाही दिवस नाही रात्र
काय कसं हे जगणं ।

नशिबाचा फेरा सारा
कधी येईल ते मरण ।
Sanjay R.