Monday, June 7, 2021

" तुजपुढे आम्ही लाचार "

देवा किती तुझे उपकार
आम्हा तुझाच रे आधार ।

संकटात येतोस धावून
उचलतो दुःखाचा भार ।

ठेवितो सुखात आम्हा
हाती तुझ्या सारा संसार ।

सांग कशी होईल परतफेड
तुजपुढे आम्ही सारे लाचार ।

धावा करतो संकटात तुझा
मार्ग सुखाचा करतो साकार ।

मनी दर्शनाची ओढ आता
देऊ नकोस रे तू नकार  ।
Sanjay R.



Sunday, June 6, 2021

" प्रश्नाला असते उत्तर "

प्रश्नाला असते उत्तर
मन कुठे आहे पत्थर ।

घालतो समजूत मनाची
नाही अपेक्षा सुखदुःखाची ।

जगणे मरणे त्याचे हाती
घाव झेलतो पुढे छाती ।

दार उघड हे स्वर्गाचे
राज्य इथे हे स्वार्थाचे ।

शोधतो अंश एक त्यागाचा
मात्र जागर होतो रागाचा ।
Sanjay R.

Saturday, June 5, 2021

" जगायचे अजून बाकी "

चालता चालता कसे
वर्षामगून गेली वर्ष ।

नाहीच कळले अजून
असतो कसा तो हर्ष ।

जगायचे राहिले अजून
या मनात अनेक दृश्य ।

खळखळून हसताना
अंतराला होतो स्पर्श ।
Sanjay R.


Friday, June 4, 2021

" अजाण इथे कोण आहे "

अजाण इथे कोण आहे
निरागस डोळे सारे पाहे ।

भावनांचा कल्लोळ मनात
सरते नाते एकच क्षणात ।

बंधनातही सारेच स्वैर
बदलते सारे येता कहर ।

भोग जीवनाचे घेतो भोगून
देवही देतो पहा ना मागून ।
Sanjay R.



Tuesday, June 1, 2021

" कठीण असे ते काय असतं "

कठीण असे ते काय असतं
मनात असलं की सगळं होतं ।

मनाचा ताबा कुणाच्या हाती
असेल इच्छा तर जुळतात नाती ।

मन कधी कशात ते गुरफटतं
मनच मग गुंता सारा सोडवतं ।

मनाला सांगा कुणाचा आधार
मी जागला की उचलतो भार ।

आहे जीवनाचाही एकच सार 
सुखदुखातून  होते सहज पार ।
Sanjay R.