Monday, November 9, 2020

" मास्क "

बघा चीनने केला कसा हो घात
घाबरली दुनिया बसली घरात ।

सगळीकडे पसरला कोरोना
ओरड दुनियेची एक सुरात ।

पद्धती जीवनाचीच बदलली
पाळतात दुरावा साऱ्या जगात ।

बाहेर निघताना घालायचा मास्क
ओळख साऱ्यांची दिसत नाही दात ।

ऑफिस झाले बंद शाळा ही बंद
जगच सारे थांबले एका क्षणात ।

हळूहळू आता होतंय सारं सुरू
तरीही आहे भीती किती मनात ।

सारेच संशोधक जोमाने भिडले
लवकरच येईल लस म्हणतात ।

सम्पव बाप्पा देवा आता हे सारे
हसू दे साऱ्यांना थांबलेल्या जगात ।
Sanjay R.


Sunday, November 8, 2020

" किरण आशेचा "

रोज चाले धावाधाव
यश कधी आपयश ।
न खचता चाले पुढे
ठेऊन मनाला खुश ।

मनी आशेचा किरण
दिसे समोरच प्रकाश ।
सर्वच सामावले इथे
वरती खुले आकाश ।

पुढे पुढे चालत राहा
करुन दुःखाचा विनाश ।
सुख दुःख येती जाती
होऊ नको रे निराश ।
Sanjay R.

Saturday, November 7, 2020

" आवडती जागा "

घरा विना कुठली जागा
आवडती या भूतलावर ।
जाईल माणूस कुठेही
लक्ष फक्त त्याचे घरावर ।

राजे रजवाडे असो किती
आवडते तर घरच असते ।
चार दिवस घेतो फिरून
नंतर मात्र घरच दिसते ।

हवे नको ते सारे जुळते
पैश्या शिवाय काय मिळते ।
घर परिवार असतो जिथे
प्रेम मात्र तिथेच मिळते ।
Sanjay R.



" गालात तुझं हसणं "

समोर तुझं असणं
आणि गालात हसणं ।
आवडतं खूप मला 
कधी उगाच रुसणं ।

विसरतो वेदना मी
ऐकतो तुझं म्हणणं ।
दुःखा विना कळेना
सुखाचं ते असणं ।

हुरहूर लागते मनाला
आणि देते दुःख रडणं ।
होताच मग मनासारखे
येते आपोआप हसणं ।

तूच आहेस मन माझे
विचारी तुझं वागणं ।
सुखावून जाते मज
सोबत तुझ्याच जगणं ।
Sanjay R.

Friday, November 6, 2020

" जीवन झाले मजा "

जीवन झाले मजा
वाटते आता सजा ।

सांगा जगायचे कसे
वाजला आहे बाजा ।

कुठे उरला माणूस
विसरला तो लाजा ।

भ्रस्ट झाला कसा
किस्सा हा ताजा ।

अविचारी किती तू
उंच तुझी ध्वजा ।
Sanjay R.