Thursday, November 5, 2020

" देतो स्वतःला आकार "

मातीला देतो आकार
घडवितो घडा कुंभार ।

काय कुणावर उपकार
कोण मानतो आभार ।

चक्रासम फिरे विचार
होई घडा तिथे साकार ।

नाही कोणी लाचार
नाही कशाचा प्रचार ।

जीवन आहे निराकार
जगतो घेऊन सदाचार ।

स्वप्न आहे एक प्रकार
शोधतो त्यातच आधार ।

पाणी तृप्त करी क्षुधा
घड्याचा हा परोपकार ।
Sanjay R.


Wednesday, November 4, 2020

" थंडीचा इशारा "

खाली जातोय पारा
आला गार गार वारा ।
आहे थंडीचा हा इशारा
गारठेल परिसर सारा ।
कराया दूर थंडीचा मारा
हवा रजईचा सहारा ।
पेटवून अंगणात शेकोटी
जीव आपुला तारा ।
गरम गरम कप एक चहा
देईल हो मग सहारा ।
Sanjay R.


Tuesday, November 3, 2020

स्वप्न

खरच खूप वाटतं
जवळ तुला घ्यावे
घेऊन घट्ट मिठीत
खूप तुला छळावे
ओठातले तुझ्या
अमृत गोड प्यावे
तोडून बंध सारे
अंतरात तुज न्यावे 
गीत प्रेमाचे मधुर
तू आणि मी गावे
Sanjay R.

" अनामिक भीती "

मनात आहे एक
अनामिक भीती ।

थांबते तिथेच मग
विचारांची गती ।

होईल कुठली
किती ही क्षती ।

कळतच नाही या
माणसाची रीती ।

छळतो माणूसच
माणसास किती ।

गुन्हा कुणाचा
कुणाच्या हाती ।

मना मनांत रे
घडू दे ना प्रीती ।

देवा सारेच आहे
तुझ्याच हाती ।
Sanjay R.


Monday, November 2, 2020

" स्वप्नपूर्ती "

कष्टाचा डोंगर उपसून
होते कथे स्वप्नपूर्ती ।
फक्त हे असमान माझे
आहे माझी ही धरती ।

ऊन वारा आणि पाऊस
आभाळ निळे वरती ।
सूर्य चंद्र असंख्य तारे
भवताल माझ्या फिरती ।

दिवस आणि रात्री इथे
कधी कशाला सरती
कंटाळला नाही समुद
रोजच येते भरती ।
Sanjay R.