Tuesday, June 30, 2020

" गावाकडची जत्रा "

महाशिवरात्रीला दरवर्षी
भरते गावात जत्रा ।
गावोगावचे लोक येतात
गर्दीची असते यात्रा ।

महादेवाचे भक्त सारे
दर्शनाला रांगच रांग ।
मनोभावे टेकून माथा
धन्य होतात शिवांग ।

सर्कस आणि सिनेमा
सोबत असतो तमाशा ।
दुकानांन वर झुंबड गर्दी
कळत नाही कुठली दिशा ।

स्त्रियांना हवे बांगड्या तोंडे
माणूस बघतो आपले जोडे ।

चिंटू मींटी ला खेळणी हवी
विसरतात सारे रोजचे गाडे ।
Sanjay R.


Monday, June 29, 2020

" कधी जाईल मी शाळेत "

स्पर्धेसाठी
बाल कविता
"कधी जाईल मी शाळेत "

सांग ना ग आई मला
कधी जाईल मी शाळेत ।

अभ्यास नाही खेळ नाही
राहू किती आता घरात ।

वाट बघताहेत मित्र सारे
मनच लागत नाही कशात ।

गुरुजी पण विसरले का ग
येईल केव्हा त्यांच्या ध्यानात ।

नको वाटतं सारंच आता
थकलो किती मी घरात ।

गप्पा गोष्टी मस्ती दंगा
सांग ठेवायचं किती मनात ।

ऑनलाइन ऑनलाइन
काय कसं ग ते शिकणं ।

शाळा किती ग छान असते
तेच हवं मला परत जगणं ।
Sanjay Ronghe


Saturday, June 27, 2020

" दिवसानंतर येते रात्र "

सरते जिथे रात्र जेव्हा
आणि होते प्रभात ।
सूर्याच्या साक्षीने होते
दिवसाची सुरुवात ।

पूर्वे पासून पश्चिमेला
चाले सूर्याचे भ्रमण ।
होताच सायंकाळ
होई अंधाराचे आक्रमण ।

अस्त होताच सूर्याचा
येई साम्राज्य अंधाराचे ।
व्यापून जाई आकाश सारे
विश्व चंद्र आणि ताऱ्यांचे ।

कुठे लखलख कुठे चमचम
रातकिड्यांचे चाले आवाज ।
मधेच दिसतो दूर काजवा
सकाळ होता सरतो साज ।
Sanjay R.



Wednesday, June 24, 2020

" भुताशी गप्पा "

करू चला आज
भुताशी गप्पा  ।
थरारक अनुभव
आयुष्यातील टप्पा ।

लहानपणी वाचल्या
बऱ्याच भुताच्या कथा ।
मनात घर केलंय त्यांनी
सांगू कशी व्यथा ।

त्यांची यायची रात्री स्वप्न 
दरदरून फुटायचा घाम ।
एकटा असलो की मग
झोपेतच ओरडायचो जाम ।

आईच्या कुशीत झोपायचो
व्हायची भीती कमी ।
भीती नाही कुणास आता
भुतालाच घाबरवतो आम्ही ।

भूत म्हणजे नुसती आहे
भीतीची एक आकृती ।
भूत काढा हे मनातलं
भ्रमाची आहे ती विकृती ।
Sanjay R.


Tuesday, June 23, 2020

" रहस्य मनाचे "

मन माणसाचं म्हणजे
आहे एक रहस्य ।
कधी रागाचा थरथराट
तर कधी सुहास्य ।

कधी चाले संथ निरंतर
एक एक श्वास ।
कधी विचारांचा कल्लोळ
त्यात नुसते आभास ।

सुख आणि शांती करी
सदा मनात वास ।
कधी लोभ आणि मोह
त्यांचाच चाले ध्यास ।

अधीर कधी अस्थिर 
अंतरातले विचार ।
कधी लागे ध्यान कुठे
भासे सारे निराकार ।
Sanjay R.