Saturday, December 14, 2019

" सून सासुवर भारी "

सून सासुवर भारी
होते सासू बिचारी ।

सत्ता सुनेची सारी
ही संसाराची वारी ।

बघून सून टीव्ही
होते कशी दुराचारी ।

अवतार सुनेचा बघून
सासू होते मग विचारी ।
Sanjay R.

Tuesday, December 10, 2019

" लय झाला वांदा "

भौ घरी न्हाई कांदा
झाला लय हो वांदा ।

भाव टेकले अभायाले
बेपारायचा होते धंदा ।

ज्यानं पिकवला त्याले
भेटला का हांडा ?

शेतकऱ्याच्या मालाले
दुसराच करते गंदा ।

ज्याची रायते मेहनत
गळ्यात त्याच्या फंदा ।

काय सांगाव बावा
पडते गळ्यावरच रंदा ।
Sanjay R.

Monday, December 9, 2019

" मी लाचार या कवितेचे प्रकाशन "

माझे व्यासपीठ मासिक मुंबई डिसेंबर 2019 अंकात माझ्या " मी लाचार " या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .

" प्रवास चाले अविरत "

मज जगण्याची ही कला झाली अवगत
जमले मला हे सारे सांगतो तुझ्याच सोबत ।

उगवतो सूर्य प्रवास चाले त्याचा अविरत
सायंकाळ होता मग विसावतो पर्वतात ।

बहरते रातराणी तिच्याच सुगंधात
बेधुंद होतो काळोख काळ्या अंधारात ।

सजीव निर्जीव सामील सारे या उत्सवात
बघतो दूर मी धावते आभाळ गगनात ।
Sanjay R.

Sunday, December 8, 2019

" आयुष्याचा पाढा "

दिवस रात्र अभ्यास करा
घेऊन डिग्री उपाशी मरा ।

नोकरी साठी तडफड करा
धंदा शेती की रिकामा बरा ।

काही तरी करून थोडे कमवा
लग्ना साठी ही चप्पल झिजवा ।

होत नाही सेटल तर वाढते वजन
डॉक्टरचे मग छान जमते भजन ।

आरोग्य चिंता त्यात मुलांचे शिक्षण
आयुष्य गेले बदलले नाही लक्षण ।

नातू पणतू सारेच जमा झाले पण
वृद्धाश्रमात हो कोणीच नाही आले ।

आठवत नाही आता शेवट काय झाले
सगळेच असून खांद्यावर कोणी नेले ।
Sanjay R.