Friday, October 25, 2019

" आली दिवाळी "

दिवाळीचा आज
पहिला दिवस ।
आहे आहे
आज धनतेरस ।

नरकचतुर्दशी आणि
होईल लक्षमीपूजन ।
आनंद उत्साहात
बघा सारेच जण ।

बलिप्रतिपदा आणि
मग भाऊबीज ।
ओवाळेल बहीण
रे भावा तुज ।

लाडू अनरसा खाऊ
चिवडा चकली ।
नवीन कपड्यात
हसेल रे छकुली ।
Sanjay R.

" प्रश्नाला असतो प्रश्न "

प्रश्नाला असतो प्रश्न
उत्तराला उत्तर ।
डोके विचारांचे घर
प्रश्न त्यात सत्तर ।
लागेल ठेच बघा
वाटेत सारेच पत्थर ।
कुणी मवाळ त्यात
कुणी बहुत कट्टर ।
वाट धरा सुखाची
शिंपडा थोडे अत्तर ।
सुखी सारेच होतील
आनंदाचे हेच उत्तर ।
Sanjay R.

Wednesday, October 23, 2019

" फुल पाखरू स्वच्छंदी "

मी असाच आहे
बघतो आनंद इतरांचा
होतो थोडा आनंदी ।
बघून दुःख मात्र
होतो दुःखी आधी ।
आहेच मी थोडा
परमानंदी ।
मात्र मनात माझ्याही
आहे एक धुंदी ।
नाहीच जमत मला
करायचे अंतराला बंदी ।
मान डोलावतो ना
असतो तो नंदी ।
मी पण होतो कधी
फुल पाखरू स्वच्छंदी ।
Sanjay R.

Tuesday, October 22, 2019

" लग्न "

लग्न एक विश्वासाचा बंध
आयुष्यभर दरवळतो सुगन्ध ।
वाट जरी असेल ही रुंद
फुलतो संसार करतो धुंद ।
जगतो जीवन मंद मंद
परंपराच ही देई आनंद ।
Sanjay R.

Monday, October 21, 2019

" चला करू या मतदान आज "

नेत्यांना तर सत्तेचा माज
नाही उरली कसलीच लाज ।
मिरवतात डोक्यावरती
भ्रष्टाचाराचा ताज
नाहीच यायचे हे असे बाज ।
दाखवू इंगा , पाडू गाज
चला करू या मतदान आज ।
Sanjay R.