Wednesday, September 11, 2019

" वाट काळजाची "

वाट या काळजाची
कशी कुठून कुठे जाते ।
येऊन तो हळूच वारा
जोरात मग हलवून जाते ।
आठवणी दडून त्यात
मनही कसे विसरून जाते ।
स्पर्श थोडा होताच मनाचा
आठवण उफाळून येते ।
मन होते उदास थोडे
आठवणींची आठवण होते ।
Sanjay R.

" मौन तुझे निरंकाळ "

कविता तुझ्या मौनाची
कथा ही जीवनाची ।

मौन तुझे निरंकाळ
शब्दांचा झाला दुष्काळ ।

नजरेला नजर नाही
कानावरती गजर नाही ।

आकाशाचे आभाळ झाले
ढगांमधून थेंब आले ।

सरसर सरसर ओले ओले
भिजून सारे चिंब झाले ।
Sanjay R.

Tuesday, September 10, 2019

" बाप्पा निघाले परतीला "

बाप्पा निघाले परतीला
चला जाऊ या आरतीला ।

दिवस दहा आम्ही केली सेवा
आनंदाचा तुम्ही दिला मेवा ।

भाव भक्तीचा मनात भरला
राग द्वेष आता नाही उरला ।

प्रसाद मोदक प्रकार किती
उत्साहाच्या पेटल्या वाती ।

करू चला हो जयघोष आता
आरती गणेशाची गाता गाता ।

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या ।
Sanjay R.

Monday, September 9, 2019

" गगन से निकली बुंदे "

गगनसे निकली जब बूंदे
बारीश हो गयी ।
आखोसे निकली दो बुंदे तो
जाने कहा खो गयी ।
क्या कहे हम ओठोसे
लब्ज कही खो गये ।
आखोमे बचे थे कुछ आसू
और वही रो लिये ।
खुशीया थी कुछ सपनोमे
न जाने कहा खो गयी ।
जी रहे अब बस उन्ही यादोमे
और अंधेरी रात हो गयी ।
Sanjay R.

"आला थोडा ताप "

आज दिवस तीन झाले
आला थोडा ताप ।
खोकल्यासोबत बघा
कशी लागते धाप ।

लागत नाही लक्ष
नकोच वाटते जेवण ।
दुखणे तीव्र हात पायाचे
कडू औषधांचे द्रावण ।

मळमळ वाटते थोडी
तोंडाला नाही चव ।
लाडू पेढे काहीही आणा
पांघरुणात ही लागते दव ।

पडायचे बिछान्यावर
सांगा झोपायचे किती ।
पडून पडून थकलो
दिवस आणि रात्र रीती ।

अशक्त वाटे शरीर
मनही झाले अस्वस्थ ।
होऊ दे ना बरे आता
येईल फिरून मस्त ।
Sanjay R.