Wednesday, March 6, 2019

" आठवण "

जे जे असेल मनात तुझ्या
सारंच दे तू ओंजळीत माझ्या ।
स्वप्न सारी तुझी नि माझी
जपून ठेवील अंतरात माझ्या ।
असतील तारे दूर जरी फार
सांगतील तुलाच आठवणी माझ्या ।
Sanjay R.

Tuesday, March 5, 2019

" परतून परत जगायचं "

गालात थोडं हसायचं
गुलाबासारखच फुलायचं ।
वाटलंच फार तर रुसायचं
क्षणात फिरून हसायचं ।
हास्य राखून थोडं गालावर
आनंदात छान दिसायचं ।
सुखद किती हा झुळझुळ वारा
सोबत त्याच्या थोडं झुलायचं ।
अथांग हे आकाश किती
मनसोक्त त्यात फिरायचं ।
हृदय हे कोमळ किती
अलगद त्यात शिरायचं ।
अनमोल हे जीवन किती
परतून परत जगायचं ।
Sanjay R.

Monday, March 4, 2019

" तनहाई "

अनजान था वो
फिर भी  लगे पहचान पुरानी ।
हसता था जब वह
लगे यह तो मेरी ही कहानी ।
न जाने  कब खो गयी
यादोमे उसके हुई मै दिवानी ।
निंद मेरी उसने चुराई
ख्वाबमे भी थी उसकी परछाई ।
देखती हु बस उसिको
छोड गयी मुझे अब मेरी तनहाई ।
Sanjay R.

" रे मना "

मना मना
सांग रे मला ।
मनातलं माझ्या
कळलं का तुला ।
भरलय गच्च आभाळ
सांगू मी कुणाला ।
भरभरून वाहू दे 
डोळ्यातल्या थेंबाला ।
होईल रितं सारं मग
नसेल कुणी बघायला ।
Sanjay R.

Sunday, March 3, 2019

2 रे वर्हाडी संमेलन

आइकत का भौ
सांगतो तुले गोठ ।
सम्मेलन वऱ्हाडीच हाये
तारीख सात आन आठ ।
मैना ठिवजो लक्षात
एपरील चा थाट ।
जाच अकोल्याले
पहाची न्हाई वाट ।
दुरून दुरून यइन
वरहंड्यायची लाट ।
तयारी जरा पायजा
सारेच पडीन चाट ।
Sanjay R.