Wednesday, December 26, 2018

" माझ्या मनातले आभाळ "

" माझ्या मनातले आभाळ "

मन आभाळ आभाळ
येई भरून क्षणात ।
कधी होई रिते सारे
नसे विचार मनात ।

कधी नजर गगनात
दाटे अंधार अंतरात ।
होई घालमेल मनाची
थेंब पाण्याचा डोळ्यात ।

कधी वाटे घेउन भरारी
जावे दूर आकाशात ।
तोडून चंद्र आणि तारे
पेरावे अंगणात ।

बाग फुलेल चांदण्यांची
चंद्र हसेल नभात ।
निरखावे रूप त्याचे
बसावे गीत आनंदाचे गात ।

मन आभाळ आभाळ
येई भरून क्षणात ।
नाही होणार रिते सारे
ठेवले आहे एका कणात ।
Sanjay Ronghe
Nagpur

Tuesday, December 25, 2018

" नवं वर्ष स्पेशल "

दिल चाहता है
करू मै मस्ती ।
लडखडताहेत पाय
झाली जास्ती ।
पाणी टाकूनच प्यायची
नहीतर
यायची आफत नसती ।
Sanjay R.
🥃🥃

Monday, December 24, 2018

" वृद्धावस्था "

काय आलेत दिवस
झाली कशी अवस्था ।
मुलं मुली गेलेत दूर
डोळे पाहताहेत रस्ता ।

हात पाय थकलेत आता
थरथरते अंग, वाटते भीती ।
म्हातारे झालेत डोळे
आसवही गळणार किती ।

कान अधू डोळे अधू
नाही कुणाची साथ ।
विसरू नको देवा मला
तुझाच रे मदतीला हात ।

आठवणींचा डोंगर उलटतो
होते विचारातच पहाट ।
नकोच वाटतो सूर्योदय
शोधतो अंधारातच वाट ।
Sanjay R.


" निमंत्रण "

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ ,
कविकट्टा काव्य मंचावर माझी वर्हाडी कविता "माह्या वऱ्हाडाची माती "
ही कविता सादर करण्या साठी निमंत्रण प्राप्त झाले 
आयोजकांचे खूप खूप आभार 


Sunday, December 23, 2018

" वा रे कांदा "

किती रडवी हा कांदा
कित्येकांचा झाला वांदा
कुणी घालतो गळ्यात फंदा
घासही खाली उतरत नाही
फोडणीला हवा एकच कांदा
नसेल तो तर होतो वांदा
Sanjay R.