Thursday, November 15, 2018

" निघायचं का प्रवासाला "

बसून बसून जाणवतो थकवा
शीण आला दिमाखाला ।
विचारांचं जाळं मोठं किती
लागतं काय त्यात गुरफटायला ।

भूतकाळाच्या आठवणी अनेक
लागतो कधी उलगडायला ।
त्यातच मग गुंफून घेतो
नसतं कोणी सोडवायला ।

दिवसा मागून दिवस जातात
वेळच नसतो जगायला ।
दिवस अंताचा येऊन ठेपतो
जातो कसा मग मरायला ।
Sanjay R.



Saturday, November 10, 2018

" बळी सांगा हो कुठला राजा "

बळी सांगा आता कुठला राजा
भोगतोय बिचारा कसली सजा ।

सरकारही लुटत आहे त्यासी
व्यापारी मापारी करताहेत मजा ।

फेकतात पैसे किती घ्यायला पिझा
शेतकऱ्याच्या मालाला भाव खुजा ।

फटका संसार त्याचा काय कसली माजा
लटकतो फासावर पाहून कर्जाचा बोजा ।
Sanjay R.

Friday, November 9, 2018

" दिवाळीचे चार दिवस "

दिवाळीचे दिवस चार
तुडुंब भरला बाजार ।
पैसे पैसा एकच विचार
फाटक्या खिशाला लागली धार ।
चिवडा लाडू फटाके अनार
नवीन साडी आणि विजार ।
दग दग सारी थकलो फार
उचलत नाही आता भार ।
धड धड फुटले फटाके चार
सरली दिवाळी नैय्या पार ।
एकत्र आला सारा परिवार
आनंदात न्हालो हाच सार ।
Sanjay R.

Tuesday, November 6, 2018

" आनंद दिवाळीचा "

दिवाळी सण आनंदाचा
अंगणात उत्सव दिव्याचा
उधळायचा रंग रांगोळीचा
झगमगाट सगळा माळांचा

दिवाळी सण आनंदाचा
वस्तू नवीन खरेदीचा
घर सुशोभित करायचा
सुगंध थोडा वाटायचा

दिवाळी सण आनंदाचा
कपडे घालून नवीन मिरवायचा
दाग दागिन्यांनी नटायचा
घ्यायचा आस्वाद फराळाचा

दिवाळी सण आनंदाचा
पुजन लक्ष्मीचे करायचा
शुभेच्छा देऊन आनंद जपायचा
जीवनात उत्साह भरायचा
Sanjay R.


Friday, November 2, 2018

" श्वास कसा घ्यायचा "


जिकडे तिकडे धुरांचे लोट
श्वास घ्यायचा, कसा ते सांगा
पेट्रोल डिझेलचे वाढलेत भाव
तरीही पंपावर मोठमोठ्या रांगा

धुरच धूर केला जिकडे तिकडे
झाला आहे आता आयुष्याचा पंगा
गाडीत टाकून स्वस्त रॉकेल
निसर्गाशी करताहेत किती हो दंगा

ढीग कचऱ्याचे दिले पेटवून सारे
तांडव धुराचा सुरु आहे सारा
एक एक श्वास जीव घेतोय आता
माणूसच माणसावर करत आहे मारा
Sanjay R.