Saturday, September 29, 2018

" स्वप्नातले जग माझ्या "

सुंदर किती रे राजा

स्वप्नातले जग माझ्या


शृंगार निसर्गाचा

मनमोहक लावण्याचा


सळसळणारा वारा

चमचमणाऱ्या तारा


झुळझुळ वाहते पाणी

पाखरं गाती गाणी


सूर्याची प्रखरता

चंद्राची शीतलता


आवतरते ईंद्राघरची परी

सोबत पावसाच्या सरी


रुणझुण वाजे चाळ

करी मन घायाळ

Sanjay R.

Friday, September 28, 2018

" अकेला "

जब रहता हु अकेला
याद तुम्हारी आती है ।
तस्वीर देखता तुम्हारी
फिर नजर सताती है ।
सफर यह जिंदागिका
हम और तुम साथी है ।
Sanjay R.

Thursday, September 27, 2018

" घर "

चार भिंतींना खिडकी आणी दार
आत थाटलेला स्वप्नांचा संसार ।
नात्याला असेल नात्याचा आधार
घराला मिळेल भावनांचा शेजार ।
Sanjay R.

Tuesday, September 25, 2018

" गळफास "

मिळुन स्वातंत्र्य आम्हास

झालो स्वतंत्र आम्ही जरी ।

मोजू नका हो दिवस

लोटलेत वर्ष कितीतरी ।


करुनी संशोधन अपार

पोचलो आम्ही मंगळा वरी ।

तरी लक्ष कुणाचे आहे

जगतो पारतंत्र्यात शेतकरी ।


रात्रंदिवस मरेस्तो राबतो

एकही दाना नाही घरी ।

वाट पाहतो चातक होऊन

पडतील कधी पावसाच्या सरी ।


बी बियाणे खते औषधे

होतो असाच कर्जबाजारी ।

एकच पाऊस देतो धोका

गाळून पडते मेहेनत सारी ।


कुणास काय जगतो कसा

किंमत शून्य आहे सरकारी ।

घेऊन गळफास लटकतो जेव्हा

करता करविता तोच हरी ।

Sanjay R.

Monday, September 24, 2018

" दिवस हरवून गेले "

सहजच उलगडता आयुष्याची पाने
आज का कसे आठवण देऊन गेले ।

जन्मापासूनचा तो इतिहास पहा
ते दिवसच कुठे हरवून गेले ।

मातीच्या भिंती त्याला कवलांचे छत
घर म्हणायचो ज्याला ते पडूनच गेले ।

अंगणात असायची बाग आणी बागेत फुलं
परसातली तुळसही सूकूनच गेली ।

गडबड गोंधळ, चाले मुलांचा कल्लोळ
सगळीकडे आता शांत शांत झाले ।

कंचे विटी दांडू धापाधुपी लपाछपी
कसे किती ते खेळ सारे लुप्त झाले ।

आपल्याच धुंदीत डोळे फोडून बघा आता
मोबाईल साऱ्यांच्या हाती आले ।

ऊन थंडी पाऊस वारा नी वेचायच्या गारा
बसल्या जागेवर आता शीण येतो सारा ।

अंतर असो कितीही पायी पायी चालायचे
लपून छापून कधी सायकलवर बसायचे ।

गॅस कुकर पंखा एसी बसायला सोफा
नव्हते यातले काहीच, पाटावरच बसायचे ।

दंगा मस्ती, गप्पा गोष्टी, आनंद सारा
सारेच कसे मोठमोठ्याने हसायचे ।

बालविहार गीतमाला रेडिओ आकाशवाणी
आरामात बसून कान लावून ऐकायचे ।

सारच संपलं आता, गेले जुने दिवस
सांगेल का कोणी काय आता सरस ।
Sanjay R.